खुनाचा गुन्हा दाखल करून अबोलीला न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:24 IST2021-09-18T04:24:19+5:302021-09-18T04:24:19+5:30

अबोली मांगले यांना सासरच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता. यामुळे घरगुती हिंसाचाराला वैतागून त्यांना आत्महत्या करावी लागली ...

Give Aboli justice by filing a murder charge | खुनाचा गुन्हा दाखल करून अबोलीला न्याय द्या

खुनाचा गुन्हा दाखल करून अबोलीला न्याय द्या

अबोली मांगले यांना सासरच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता. यामुळे घरगुती हिंसाचाराला वैतागून त्यांना आत्महत्या करावी लागली आहे. या प्रकरणाची चौकशी जलदगतीने होणे गरजेचे आहे. यामध्ये संबंधित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. आरोपींवर कडक कारवाई करून अबोली मांगले हिला न्याय मिळवून द्यावा, असे निवेदन इनरव्हील क्लब पर्ल्सने केले आहे. यावेळी नीलिमा गोसावी, जयलक्ष्मी माने, गौरी गोसावी, नीलिमा शिंदे, विद्या रेपाळ, सारिका कासार, चैताली कवडे, स्वप्निल गाडे, पल्लवी उपाध्ये, मनीषा भुजबळ, मृणालिनी गोसावी, श्वेता पाटील, प्रिया सोनवणे, आदी उपस्थित होत्या.

..........

फोटो : उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना निवेदन देताना नीलिमा गोसावी, जयलक्ष्मी माने, गौरी गोसावी, नीलिमा शिंदे, विद्या रेपाळ, सारिका कासार उपस्थित होत्या.

Web Title: Give Aboli justice by filing a murder charge