शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सालगड्याच्या मुलाशी प्रेमविवाह केलेल्या मुलीचा आई-वडिलांनी केला खून, मंगळवेढा येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 11:38 IST

मंगळवेढा : सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने संतापलेले वडिल व सावत्र आई यांनी २२ वर्षीय बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेणाºया मुलीस जिवे मारून तिच्यावर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वडिल विठ्ठल धोंडीबा बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी विठ्ठल बिराजदार यांच्याविरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल करून दोघांना रात्री उशिरा अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी ...

ठळक मुद्देपोलीसांनी गुन्हा दाखल करून दोघांना रात्री उशिरा अटक केलीदोन्ही आरोपींना सलगर येथून कसोशिने ताब्यात घेतले.

मंगळवेढा : सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने संतापलेले वडिल व सावत्र आई यांनी २२ वर्षीय बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेणाºया मुलीस जिवे मारून तिच्यावर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वडिल विठ्ठल धोंडीबा बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी विठ्ठल बिराजदार यांच्याविरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल करून दोघांना रात्री उशिरा अटक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मयत अनुराधा विठ्ठल बिराजदार(वय २२ वर्षे) हिने सालगड्याच्या मुलाशी प्रेमविवाह केला होता. सदर मयत ही कर्नाटकातील सिंदगी येथे बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत आहे. तेथे जावून त्या मुलाने प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहाचे वृत्त वडिल तथा आरोपी विठ्ठल बिराजदार यास समजल्यानंतर सिंदगी येथे जावून मयतास तात्काळ घेवून आले व दि.२ आॅक्टोबर रोजी पहाटे १.३० वा.बोराळे येथील फियार्दी बाळासाहेब म्हमाणे यांच्याकडे सोडून गेले. प्रेमविवाहाच्या बदनामीमुळे मयताचे वडिल संतापले व त्यांनी फियार्दीस मुलीने सालगडी असलेल्या मुलाबरोबर प्रेमविवाह केल्याचे सांगून तिला तेथे सोडून गेले. यावेळी जाताना आरोपीने माझी बदनामी झाली आहे, तिला आता जिवंत ठेवणार नाही असे म्हणून आरोपी निघून गेला. दि.४ रोजी दुपारी १.३० वा.च्या दरम्यान आरोपीने बोराळे येथे येवून अनुराधाची तोंडी परीक्षा राहिली आहे. तिला घेवून जातो असे सांगून इनोव्हा गाडीतून घेवून गेला व दि.५ आॅक्टोबर रोजी सलगर येथे अनुराधा हिला दोघा पती-पत्नींनी जिवे ठार मारून शेतात पहाटे ४ वा.अंत्यविधी उरकला. मयत अनुराधा हिने मृत्यूपूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या होत्या.

त्यामध्ये वडिल व सावत्र आई यांच्यापासून माज्या जिवीताला धोका आहे, ते मला मानसिक त्रास देतात, मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत हे माज्या लक्षात आले असून माझा मृत्यू झाल्यास त्यांना जबाबदार धरण्यात यावे असे चिठ्ठीत नमुद करण्यात आल्याचे दिलेल्या फियार्दीत बाळासाहेब म्हमाणे यांनी म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय तोंडले व पो.कॉ.संजय गुटाळ यांनी दोन्ही आरोपींना सलगर येथून कसोशिने ताब्यात घेतले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस