झोका खेळताना फास लागून बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:19 IST2021-04-26T04:19:28+5:302021-04-26T04:19:28+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिलाषा शिवपुत्र गुरव हिचे आईवडील रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शहरातील खंडोबा मंदिर येथे दर्शनासाठी गेले ...

Girl dies after being trapped while playing Zoka | झोका खेळताना फास लागून बालिकेचा मृत्यू

झोका खेळताना फास लागून बालिकेचा मृत्यू

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिलाषा शिवपुत्र गुरव हिचे आईवडील रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शहरातील खंडोबा मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. तेव्हा मुख्य दरवाजा बंद होता. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पाहुण्यांच्या लहान मुलींसाठी साडीचा झोका बांधण्यात आला होता. त्यावर बसून अभिलाषा झोका खेळत होती. तेव्हा अचानकपणे तिच्या गळ्याला फास बसून मृत्यू झाला. सकाळी ९.४५ वाजता आई, वडील देवदर्शन करून परत घरी आले असता, दरवाजा बंद होता. तो उघडत नसल्याने पारच्या साहाय्याने तोडला असता मुलगी फास बसलेल्या अवस्थेत लोंबकळत होती. ते तत्काळ काढले. ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा केला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर मूळगावी उमदी ता.जत तिच्यावर रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड हे करीत आहेत.

फोटो

२५अभिलाषा गुरव-अक्कलकोट

Web Title: Girl dies after being trapped while playing Zoka