शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

गिरीश कर्नाड स्वभावाने मवाळ, साधे होते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:46 IST

सोलापुरातील ललित कला मंदिराच्या नाट्यकलावंतांनी ‘उंबरठा’ शूटिंगवेळीच्या जागविल्या आठवणी 

ठळक मुद्देउंबरठा’ चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना कमलप्रभा हावळे यांनी गिरीश कर्नाड यांच्यासोबत आलेला अनुभव सांगितला.गिरीश कर्नाड यांनी १९९२ साली ‘तलेदंड’ हे नाटक लिहिले होते. बाराव्या शतकात झालेल्या आंतरजातीय प्रेमविवाहावर आधारित हे नाटक होतेराजा बिज्जलाच्या पत्नीचे नाव कर्नाटकातील एकाही शिलालेखात आढळले नव्हते

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : विख्यात अभिनेते गिरीश कर्नाड यांचे सोमवारी निधन झाले.  सोलापुरातील ललित कला मंदिरच्या सुशीला वनसाळे, कमलप्रभा हावळे व संजीवनी काळे यांना गिरीश कर्नाड यांच्याबरोबर उंबरठा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या तीन ज्येष्ठ रंगकर्मींनी कर्नाड यांच्याबरोबरच्या आठवणी जागविल्या...खूप मवाळ स्वभावाचे गिरीशजी सर्वांमध्ये पटकन मिसळून जायचे, असे त्यांनी सांगितले. 

 उंबरठा सिनेमात काम करण्यासाठी दिवंगत रंगकर्मी नामदेव वठारे यांनी ललित कला केंद्रात अभिनय करणाºयांची नावे दिग्दर्शक जब्बार पटेल यांना सुचवली होती. त्यामध्ये सुशीला वनसाळे, कमलप्रभा हावळे व संजीवनी काळे यांचा समावेश होता. त्यामुळे कर्नाड एक अभिनेता आणि माणूस म्हणून या तिघींना अनुभवता आले.

सुशीला वनसाळे म्हणाल्या,  मराठी चित्रपट ‘उंबरठा’ हा खूप लोकप्रिय ठरला होता. पुढे हा चित्रपट हिंदीमध्ये ‘सुबह’ या नावाने प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे गिरीश कर्नाड यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात एका हॉटेलमध्ये आम्ही सर्वजण राहत होतो.

 यादरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. सेटवर ते एकदम साधेपणानेच वागायचे. तिथे असलेल्या लहान मुलांशीही ते गप्पा मारायचे. 

 ‘उंबरठा’ चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना सेटवर एक अभिनेता आला होता. त्यावेळी आमच्यासोबत काम करणाºया अनेक मुली त्या अभिनेत्याला भेटायला गेल्या. त्यावेळी मी एकटीच बसल्याचे पाहून गिरीश कर्नाड यांनी माझी विचारपूस केली. माझ्या घरी कोण-कोण असतात हे देखील त्यांनी मला विचारले. त्यांच्याशी बोलताना मला भीती वाटत होती, पण त्यांचा स्वभाव हा खूप मवाळ होता. ते पटकन सर्वांसोबत मिसळायचे, असे कमलप्रभा हावळे यांनी सांगितले.

संजीवनी काळे म्हणाल्या, गिरीश कर्नाड खूप मोठे अभिनेते होते. त्यांच्या वागण्यात मात्र साधेपणाच असायचा. सरळ मनाचे, दर्दी, अभिनय सम्राट असा हा माणूस होता.

 ‘उंबरठा’ चित्रपटामुळे त्यांच्यासोबत काम करायला मिळाले. त्यांच्यासोबत काम करत असताना खूप काही शिकायला मिळाले. ते पटकन सर्वात मिसळायचे़ सिनिअर-ज्युनिअर अभिनेता असा भेद त्यांनी कधीच केला नाही.

..आणि त्यांनी मला सिगारेट आॅफर केली- उंबरठा’ चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना कमलप्रभा हावळे यांनी गिरीश कर्नाड यांच्यासोबत आलेला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, एकेदिवशी गिरीश कर्नाड हे धूम्रपान करण्यासाठी बाहेर आले होते. त्यांच्याजवळ सिगारेट होती, पण माचीस बॉक्स नव्हता. त्यांनी माचीस शोधले पण त्यांना ते मिळाले नाही. माझ्या पर्समधील माचीस मी त्यांना दिले. त्यावेळी त्यांनी मलाही सिगारेट आॅफर केली. मी सिगारेट ओढत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी मग माचीस सोबत का ठेवता असे विचारले. त्यावर मी म्हणाले, माझ्याजवळ नेहमी लागणाºया गरजेच्या वस्तू असतात. माझ्याजवळ मेणबत्ती असते म्हणून मी माचीसही ठेवल्याचे त्यांना सांगितले.त्यावर ते हसले आणि म्हणाले, बरं झालं तुम्ही मला सांगितलं. नाहीतर मला वाटलं असतं तुम्ही सिगारेट ओढता तरीही मी तुम्हाला आॅफर केली नाही.

तलेदंड आणि सोलापूर..गिरीश कर्नाड यांनी १९९२ साली ‘तलेदंड’ हे नाटक लिहिले होते. बाराव्या शतकात झालेल्या आंतरजातीय प्रेमविवाहावर आधारित हे नाटक होते. आंतरजातीय प्रेमविवाहामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वर्णन या नाटकात करण्यात आले होते. राजा बिज्जलाच्या पत्नीचे नाव कर्नाटकातील एकाही शिलालेखात आढळले नव्हते. मात्र, हे नाव  नान्नज येथील एका ठिकाणच्या शिलालेखात पुरातत्व संशोधक आनंद कुंभार यांना मिळाले होते. याचा  कर्नाड यांना खूप आनंद झाला होता.

टॅग्स :SolapurसोलापूरGirish Karnadगिरिश कर्नाडmusicसंगीत