शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

३०० टन क्रेनद्वारे सात तासात बसविले गुलबर्ग्यातील पुलावरील गर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:35 IST

मध्य रेल्वे : गुलबर्गा शहरातील रेल्वे पुलाचे काम पूर्ण; दोनशे कर्मचाºयांच्या ताफ्याने दिले योगदान

ठळक मुद्देगुलबर्गा शहरातून जाणाºया चौपदरीकरणावर असलेला रेल्वेचा पूल उभारण्यात आला पुलामुळे रेल्वे गाड्या आता अधिक वेगाने धावतील़ लॉकडाऊन काळात प्रवासी गाड्या बंद

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर-वाडी मार्गावर गुलबर्गा-जेवरगी या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे़ गुलबर्गा शहरातून जाणाºया या महामार्गावरील रेल्वे पूल उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले़ ३०० टन क्रेनद्वारे सात तासात सात गर्डर बसवून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला़ दोन दिवसांच्या या कामासाठी १५० ते २०० कर्मचाºयांचा ताफा वापरण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.

लॉकडाऊन काळात प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्याचा फायदा घेत रेल विकास निगम लिमिटेडच्या वतीने सोलापूर विभागातील दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे़ प्रलंबित असलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी रेल विकास निगमकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत़ गुलबर्गा शहरातून गुलबर्गा ते जेवरगी हा रस्ता दोन पदरी रस्ता आता चौपदरीकरण करण्यात आला आहे़ या रस्त्यावर पूर्वी दोन रेल्वे ट्रॅक होते, आता चौपदरीकरण कामात रेल्वेने पाच ट्रॅक बनविले आहेत़ शहरातून जड वाहतूक घेऊन जाणाºया वाहनधारकांसाठी रेल्वेने उड्डाण पूल बनविला आहे.

सात गर्डर अन् दोन क्रेनसोलापूर-वाडी रेल्वे सेक्शन दरम्यान गुलबर्गा शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या पुलासाठी ३०० टनाचे दोन रोड क्रेन तैनात ठेवले होते़ २५ टनाचे सात गर्डर बसविण्याचे काम हाती घेतले होते़ पहिल्या दिवशी चार तर दुसºया दिवशी दोन गर्डर बसविण्यात आले़ सात तासांच्या या यशस्वी कामामुळे गुलबर्गा ते जेवरगी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला़ 

गुलबर्गा शहरातून जाणाºया चौपदरीकरणावर असलेला रेल्वेचा पूल उभारण्यात आला आहे़ हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे़ या पुलामुळे रेल्वे गाड्या आता अधिक वेगाने धावतील़ लॉकडाऊन काळात प्रवासी गाड्या बंद असल्याने सोलापूर विभागातील दुहेरीकरण, विद्युतीकरण व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत़ - एस. एच. कुलकर्णी,वरिष्ठ अधिकारी, रेल विकास निगम लिमिटेड, मध्य रेल्वे

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेGulbarga Societyगुलबर्गा सोसायटी