शहरं
Join us  
Trending Stories
1
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
2
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
3
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
4
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
5
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
6
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
7
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
8
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
9
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
10
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
11
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
12
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
13
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
14
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
15
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
16
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
17
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
18
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
19
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
20
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 

सुभाष देशमुख यांच्या भाषणावेळी गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 4:39 AM

सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत नामविस्तार सोहळा पार पडला.

सोलापूर : सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्यानंतर लागलीच बुधवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत नामविस्तार सोहळा पार पडला. पण या कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलण्यासाठी उभे राहिले. पण बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत गोंधळ घातला.नामविस्तार सोहळाच्या का कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलण्यासाठी उभे राहिले. ‘सर्वांच्या एकजुटीमुळे सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे,’ असे त्यांनी म्हणताच सभामंडपात उजव्या बाजूला बसलेल्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला. विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी तुमचे कोणतेही योगदान नाही, साधे पत्रसुद्धा दिले नाही, अशी ओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे देशमुख यांना थोडावेळ थांबावे लागले. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलीस धावले. कार्यकर्त्यांना शांत केल्यानंतर देशमुख यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.