शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

‘पॉझिटिव्ह लिस्ट’ मिळताच ‘खाकी’ लागते कामाला; ‘कॉल लिस्ट’वरून हुडकतात संपर्कातील लोकांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 11:50 IST

रुग्ण आढळल्यानंतरची मोहीम; भीतीमुळे खरी नावं शोधताना प्रशासनाची होतेय दमछाक 

ठळक मुद्देच्एखाद्या कोरोनाबाधितामुळे किती जणांना संसर्ग झाला, हे शोधणे, महानगरपालिकेला अवघड जात होतेशहर पोलिसांनी ही जबाबदारी स्वीकारली, त्यासाठी ३० जणांचे पथक तयार केलेनेमकी व्यक्ती कशी शोधायची हा प्रश्न पडतो. त्यामुळे सतत वेगवेगळ्या अडचणी पोलिसांना येत असतात

संताजी शिंदे

सोलापूर : एखाद्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला.. तर संपर्कातील नातेवाईक, शेजारी अन् मित्रांचा शोध घेणे म्हणजे एक आव्हानच. हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले ते शहर पोलिसांनी. तीन-साडेतीन महिन्यांत महापालिकेच्या दिमतीला असलेल्या पोलिसांनी रुग्णांच्या संपर्कातील आठ हजार जणांचा शोध घेत त्यांना शासकीय रुग्णालयात आणले. त्यातील ४१२ जण कोरोनाबाधित निघाले. कोरोनाशी दोन हात करताना पोलिसांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही.

च्एखाद्या कोरोनाबाधितामुळे किती जणांना संसर्ग झाला, हे शोधणे, महानगरपालिकेला अवघड जात होते. मात्र शहर पोलिसांनी ही जबाबदारी स्वीकारली, त्यासाठी ३० जणांचे पथक तयार केले. पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाकडे चौकशी करीत असताना आपण अडचणीत आलो आहोत, दुसºयाला आणखी कशाला संकटात टाकायचे, हा विचार करून लवकर नावे सांगायला तयार होत नसत.च्विश्वासात घेऊन खोदून खोदून विचारल्यानंतर जी नावं पोलिसांना मिळत होती त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना होते. मिळालेल्या नावाच्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, ‘तिथे आम्ही नव्हतो. मला कसला आजार नाही. मी व्यवस्थित आहे’, असे सांगून तपासणीला येण्यासाठी टाळण्याचा प्रयत्न होतो. 

च्एखाद्या घरामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास पोलिसांचे पथक संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांच्या पत्त्यावर जाते. पत्ता व्यवस्थित नसतो. शोधताना कसरत करावी लागते. एका व्यक्तीच्या नावाचे तीन ते चार लोक असतात. नेमकी व्यक्ती कशी शोधायची हा प्रश्न पडतो. त्यामुळे सतत वेगवेगळ्या अडचणी पोलिसांना येत असतात. 

कोणत्या भागात धोका, हेही यातून कळतं !पोलिसांचे हे पथक दिवसभर कार्यरत असते. आलेल्या माहितीचे विश्लेषण करून अशा भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील काळात कोणत्या भागामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे, याचा अहवाल महानगरपालिकेला दिला जातो. कोणत्या भागात, सोसायटीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये कंटेन्मेंट झोन करावा लागेल, याची माहिती त्यात दिली जाते. या मोहिमेत आजवर सुमारे आठ हजार लोकांची माहिती पोलिसांनी पुरवली आहे. - अंकुश शिंदे,पोलीस आयुक्त  

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस