दोन गावठी पिस्तुले हस्तगत
By Admin | Updated: February 20, 2017 04:00 IST2017-02-20T04:00:04+5:302017-02-20T04:00:04+5:30
बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून

दोन गावठी पिस्तुले हस्तगत
सोलापूर : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. जाकीरहुसेन अब्दुल सत्तार पिरजादे (२७,रा, होटगी) व जयेंद्र ऊर्फ शहाजी पवार (३४,रा, सुभाष नगर, मिरज, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांच्याकडील दोन गावठी बनावटीची पिस्तुले व आठ जिवंत काडतुसे, एक लोखंडी कुकरी, अशी १ लाख ९०० रुपयांची शस्त्रास्त्रे सापडली. या दोन्ही आरोपींविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)