शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर बंधाºयाचे दरवाजे उचकटून रात्रीत पाणी पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 21:55 IST

पोलिसात गुन्हा : ग्रामस्थांच्या १२ तासांच्या प्रयत्नानंतर पाणी थांबले...!

सोलापूर : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील पाण्याचा वाद पुन्हा उन्हाळ्यात उफ ाळून येत  आहे.  शुक्रवारी रात्री गुबेवाड (ता. इंडी, जि़ विजापूर) येथील जवळपास ३० लोकांच्या जमावाने सीमावर्ती भागात अक्कलकोट तालुक्यात खानापूर येथील बंधाºयावर येऊन दरवाजे उचकटले आणि कर्नाटकमध्ये पाणी पळवले, त्यानंतर आलेल्या वाहनातून त्यांनी पळ काढला. दरम्यान, ही घटना समजताच खानापूर आणि अंकलगेतील ग्रामस्थ बंधाºयावर आले आणि १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे पाणी थांबवले.

 कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असून घराबाहेर पडणाºयांवर पोलीस कारवाया होत आहेत. नेमके याचाच फायदा उठवत शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या दरम्यान इंडी तालुक्यातील जवळपास ३० जणांचा जमाव एका मालवाहतूक वाहनातून (के़ ए़ १५ /१८ १५६)  अक्कलकोटमधील खानापूर बंधाºयावर पोहचले़  या पाठोपाठ एका दुचाकीवरुन (एम़ एच़१३ / डी़ डी़ ३७५१) काहीजण आले. सारेजण मिळून बंधाºयावरील प्लेट उचकटून काढले. काही प्लेट पाण्यात टाकून दिले. यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी वाहून कर्नाटकात गेले. त्यानंतर या लोकांनी आलेल्या वाहनातून पळ काढला. संचारबंदी काळात वाहनातून पळ काढणारे लोक अंकलगे आणि खानापूरमधील लोकांच्या निदर्शनास आले. 

 यानंतर या दोन्ही गावात ही बातमी रात्री वाºयासारखी पसरली. अंकलगेचे माजी सरपंच शिवमूर्ती विजापुरे आणि आंबण्णा विजापुरे हे दोन्ही गावच्या ग्रामस्थांना घेऊन बंधाºयावर दाखल झाले. त्यांनी रात्री बारदाने (पोती) आणि काही बॅरेगेट शोधून पाणी अडवले. काही ठिकाणी तशीच गळती चालू राहिली. -----------खानापूर येथील भीमा नदी बंधाºयावरील दरवाजे काढून अज्ञात लोकांनी पाणी पळवले आहे. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने पाणी थांबवले आहे. सध्या या बंधाºयातून खानापूर, अंकलगे आणि गुड्डेवाडी या गावांना पाणी पुरवठा होतो. आणखी दोन महिने पुरेल इतका पाणी साठा बंधाºयात आहे़ पुन्हा पाणी पळविले जाणार नाही याची खबरदारी घेतोय. - प्रफुल्ल ढवळे शाखा अभियंता, पाठबंधारे विभाग, अक्कलकोट

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकCrime Newsगुन्हेगारी