पंढरपुरात गॅसचा स्फोट, दोन घरे पेटले, कौटुंबिक साहित्य जळून खाक

By Admin | Updated: June 1, 2017 20:07 IST2017-06-01T20:07:37+5:302017-06-01T20:07:37+5:30

-

Gas blast in Pandharpur, two houses burnt, family burns burnt | पंढरपुरात गॅसचा स्फोट, दोन घरे पेटले, कौटुंबिक साहित्य जळून खाक

पंढरपुरात गॅसचा स्फोट, दोन घरे पेटले, कौटुंबिक साहित्य जळून खाक


आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि १ : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील एका घरात गॅस सिलेंडर लिंक होऊन गुरुवारी सकाळच्या सुमारास स्फोट झाला. यामध्ये दोन घराला आग लागल्याने घरातील साहित्य जळून संबंधित मालकाचे नुकसान झाले आहे.
मंदिर पसिरातील तांबेकर गल्लीत श्री बडवे व डिंगरे यांच्या घरांना गॅस सिलेंडर लिक होऊन आग लागली होती. ही बातमी समजताच माजी नगरसेवक अनिल अभंगराव, सचिन डांगे, नागेश भोसले, विनायक हरिदास, संजय जव्हेरी, बाबा महाजन, ऋषी उत्पात, शैलेश बडवे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या आगीमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
त्याचबरेबर काही वेळाने तेथे नगरपालिकेची अग्निशमन गाडी पोहोचली़ त्यांनी पाण्याचा फवारा मारून दोन्ही घरातील आग आटोक्यात आणली.

Web Title: Gas blast in Pandharpur, two houses burnt, family burns burnt