४८ किलोमीटरवरचा उचलला कचरा

By Admin | Updated: May 12, 2014 00:53 IST2014-05-12T00:53:43+5:302014-05-12T00:53:43+5:30

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात स्वच्छता

Garbage lifted from 48 kms | ४८ किलोमीटरवरचा उचलला कचरा

४८ किलोमीटरवरचा उचलला कचरा

सोलापूर : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़ विशेषत: शहरातील अथवा गल्लीबोळातील एक रस्ता नव्हे तर तब्बल ४८ किमी रस्ता निरपेक्ष भावनेने स्वच्छ करुन दाखविले़ सकाळी ७़३० वाजता पांजरापोळ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रस्ते स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ केला़ तत्पूर्वी शनिवारी महापालिकेत या स्वच्छता मोहिमेसंदर्भात अ‍ॅड़ उमेश भोजने यांच्यासमवेत बैठक झाली होती़ दिवसभरात शिवाजी चौक-जोडबसवण्णा चौक, शिवाजी चौक-जुना तुळजापूर नाका, शिवाजी चौक-रेल्वे स्टेशन, शिवाजी चौक-संगमेश्वर महाविद्यालय, शिवाजी चौक-अभिमानश्रीनगर, रंगभवन-गांधीनगर, समाचार चौक-रंगभवन, आसरा चौक-शास्त्रीनगर, अशोक चौक-कुमठा नाका, सात रस्ता -सैफुल, शेळगी-गावठाण परिसर अशा विविध भागात एकाचवेळी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़

---------------------------------------

राज्यात ५३ शहरांत स्वच्छता समाजसुधारक आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज एकाच दिवशी राज्यात ५३ शहरांत ३३५०़८६ किमी रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबविली गेली़ ६३ हजार स्वयंसेवक या कामात निरपेक्षतेने सहभाग नोंदवला़ या कामातून त्यांची मानवी साखळी दिसून आली़

--------------------------------------------

 

Web Title: Garbage lifted from 48 kms