अक्कलकोटातील गणेशमूर्ती कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:30+5:302021-08-21T04:26:30+5:30
यंदा दि. ६ सप्टेंबर रोजी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. अक्कलकोट शहरातील कुंभार गल्लीतील कारागीर गेल्या कित्येक वर्षांपासून मूर्ती बनवितात. ...

अक्कलकोटातील गणेशमूर्ती कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये जाणार
यंदा दि. ६ सप्टेंबर रोजी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. अक्कलकोट शहरातील कुंभार गल्लीतील कारागीर गेल्या कित्येक वर्षांपासून मूर्ती बनवितात. त्यांना जागा कमी पडत असल्याने ते आता गाणगापूर रोडवरील औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे आता त्या वसाहतीत गणेशनगरच वसले आहे. सुमारे आठ कुटुंबीय मागील तीन पिढ्यांपासून मूर्ती बनविण्याचे काम करतात. गेल्या वर्षापासून कोरोनामुळे काही निर्बंध आले आहेत. शासन नियमाच्या आधीन राहूनच मूर्ती तयार करण्यात येत आहेत. यंदा एक फुटापासून ते सहा फुटांपर्यंत मूर्ती तयार आहेत. या मूर्ती आंध्र प्रदेश, हैदराबाद, कर्नाटकात विक्रीस जात असतात. तसेच उमरगा, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांतूनही मागणी असते.
........
गणेशमूर्ती बनविण्याचे काम मागील तीन पिढ्यांपासून सुरू आहे. दरवर्षी आम्ही बनविलेल्या लाखो मूर्ती महाराष्ट्रसह परराज्यात विक्रीला जात असतात. सध्या काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच गाडी भरून पाठवण्यात येणार आहे. निर्बंध पाळूनच मूर्ती तयार करण्यात आले आहेत.
- भीमाशंकर कुंभार, मूर्तिकार.
........
फोटोओळ
अक्कलकोट येथे गणेशमूर्तींवर अंतिम हात फिरवताना कारागीर भीमाशंकर कुंभार.
.........
फोटो : २०अक्कलकोट१