शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गण आरक्षण जाहीर, सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीचा समावेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:01 IST

सोलापूर, बार्शी आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गणांच्या आरक्षणाची सोडत शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात काढण्यात आली.

ठळक मुद्देसोलापूर बाजार समितीसाठी मार्डी, बोरामणी, बाळे, मुस्ती आणि मंद्रुप हे गण आरक्षित झालेबाजार समितीच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहेहिरज येथून माजी सभापती दिलीपराव माने निवडणूक लढविण्याची शक्यता

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : सोलापूर, बार्शी आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गणांच्या आरक्षणाची सोडत शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात काढण्यात आली. सोलापूर बाजार समितीसाठी मार्डी, बोरामणी, बाळे, मुस्ती आणि मंद्रुप हे गण आरक्षित झाले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनाने १५ गणांची रचना जाहीर केली होती. गणरचनेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एस. व्ही. धुमाळ आदी उपस्थित होते. प्रत्येक गणाच्या चिठ्ठ्या एका प्लास्टिकच्या डब्यात टाकण्यात आल्या. चार मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. तिन्ही बाजार समित्यांसाठी पाच गण आरक्षित झाले आहेत. ------------सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती-महिला प्रवर्ग - मंद्रुप, बाळे, विमुक्त जाती/भटक्या जमाती - मार्डी,इतर मागास - मुस्ती, अनुसूचित जाती/जमाती - बोरामणी.-बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती : महिला - पानगाव, पांगरी, विमुक्त जाती/भटक्या जमाती - उपळाई ठोंगे, इतर मागास - उक्कडगााव, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती - सासुरे-करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती- महिला - उमरड, रावगाव,विमुक्त जाती/भटक्या जमाती - झरे, इतर मागास - जातेगाव, अनुसूचित जाती/जमाती - जिंती-----------------माजी पदाधिकाºयांचे गण खुलेउत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज आणि पाकणी गण खुले आहेत. हिरज येथून माजी सभापती दिलीपराव माने निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव किंवा भंडारकवठे गण खुले राहिले आहेत. येथून माजी उपसभापती सुरेश हसापुरे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. कणबस गण खुला असल्याने येथून माजी सभापती राजशेखर शिवदारे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. मार्डी गण आरक्षित राहिल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, इंद्रजित पवार यांना इतर दुसरा मतदारसंघ शोधावा लागेल. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती