जुगार अड्ड्यावर छापा, ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त, आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:22 IST2021-04-07T04:22:40+5:302021-04-07T04:22:40+5:30

याबाबत पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांना कमलापूर येथील सोमनाथ अनुसे यांच्या शेत गट नंबर ४६१ मध्ये बाळकृष्ण बहुउद्देशीय कला, ...

Gambling den raided, Rs 43,000 seized, eight arrested | जुगार अड्ड्यावर छापा, ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त, आठ जणांना अटक

जुगार अड्ड्यावर छापा, ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त, आठ जणांना अटक

याबाबत पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांना कमलापूर येथील सोमनाथ अनुसे यांच्या शेत गट नंबर ४६१ मध्ये बाळकृष्ण बहुउद्देशीय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या ठिकाणी काही लोक एकत्र येऊन गोल रिंगण करून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलीस नाईक अभिजित मोहोळकर, पोलीस नाईक महेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शिंदे, मुजावर यांनी छापा टाकला.

यावेळी रुनील यमाजी चंदनशिवे, प्रकाश जगन्नाथ ऐवळे, पांडुरंग बाळासाहेब अनुसे, समाधान विठ्ठल म्हात्रे, महंमद तय्यब मुलाणी, सर्वजण रा. कमलापूर, बाळकृष्ण नारायण चौगुले, अमित गोविंद विभुते, नीलेश बाळकृष्ण चौगुले, रा.यलमर, मंगेवाडी असे सर्वजण एकत्र आले. कोरोनाबाबत कोणतीही दक्षता न घेता तीनपत्ती नावाचा हारजीत जुगार पैशाच्या स्वरूपात प्लास्टिक क्वाइनचा वापर करून खेळताना ४३ हजार ७९० रुपयांसह त्यांना रंगेहात पकडले.

Web Title: Gambling den raided, Rs 43,000 seized, eight arrested