मोडनिंबमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १० जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:21 IST2021-03-14T04:21:14+5:302021-03-14T04:21:14+5:30

मोडनिंब येथे शंभूराजे मोरे यांच्या गोडवूनच्या पाठीमागे मोकळ्या जागेत झाडाखाली काही तरुण खुलेआम जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना ...

Gambling den raided in Modenimb, 10 arrested | मोडनिंबमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १० जणांना अटक

मोडनिंबमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १० जणांना अटक

मोडनिंब येथे शंभूराजे मोरे यांच्या गोडवूनच्या पाठीमागे मोकळ्या जागेत झाडाखाली काही तरुण खुलेआम जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे मोडनिंब येथील आऊट पोस्टच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाड टाकली असता तेथे १० जण गोलाकार बसून मन्ना हा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या समाधान उत्तम भोसले (३५, रा. रोपळे), सचिन नरहरी मोरे (३५), अजिंक्य मोहन मोरे (२६), नितीन शिवाजी मोरे (३०), निखिल दिगंबर मोरे (२६), सुजित सुनील गाडे (२७), समाधान दिगंबर मोहिते (२६), सर्वजण रा. बावी, ता. माढा, दिग्विजय अशोक पवार (२२), रा.वस्ती माढा, धनाजी हरी ताटे (३०), रा. जाधववाडी व चंद्रकांत पाटील, रा. उद्यमनगर कोल्हापूर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांना रोख ७ हजार ५४० रुपये, दोन मोबाइल व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. तसेच पोलिसांनी सर्वांवर मुंबई जुगार अधिनियम व इतर कलमांन्वये कारवाई केली.

फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम शिवाजी माने-देशमुख यांनी दिली. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी भोसले करीत आहेत.

Web Title: Gambling den raided in Modenimb, 10 arrested