शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

‘त्या’ पाच जणांवर अंत्यसंस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:02 IST

धुळे घटना: शोकाकुल वातावरण: नातलगांमध्ये संताप; मंगळवेढ्यात बंद 

ठळक मुद्देया घटनेच्या निषेधार्थ मंगळवेढ्यात कडकडीत बंद वाढलेला संताप पाहून जिल्हाधिकाºयांनी लेखी पत्र दिल्यानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

मंगळवेढा: मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये देण्याची घोषणा आणि इतर मागण्यांबाबत जिल्हाधिकाºयांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच  राईनपाडा (जि. धुळे) येथे मृत्यूमुखी पडलेल्या पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ मंगळवेढ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. नातलगांमधून संताप व्यक्त करण्यात आला. 

सकाळी सात वाजता पिंपळगाव येथून मृतदेह मंगळवेढा तालुक्यातील खवे आणि मानेवाडी येथे आणण्यात आले. अग्नू श्रीमंत इंगोले याचा मृतदेह मानेवाडी येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खवे येथे भारत शंकर माळवे, दादाराव शंकर भोसले आणि भारत शंकर भोसले यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राजू रामा भोसले याचा मृतदेह गुंदवान (ता. इंडी जि. विजापूर) येथे ताब्यात देण्यात आला. मृतदेह ताब्यात देऊन पोलीस निघून गेल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. जिल्हाधिकाºयांनी स्वत: याबाबत लेखी आश्वासन द्यावे त्यानंतरच मृतदेह हलविले जातील, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यानंतर खवे गावातील जि. प. शाळेसमोर सभा झाली. 

या सभेत मृतांना तातडीची दहा लाखांची मदत देण्यात यावी, यासंदर्भातील खटला जलदगती न्यायालयासमोर चालवावा, यासाठी उज्वल निकम यांच्याप्रमाणे सक्षम वकील देण्यात यावा, या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

समाजाचे नेते मच्छिंद्र भोसले, भरतकुमार तांबिले, पोलीस उपअधीक्षक मच्छिंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक शिवनाथ शिंदे, निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप, भैरु भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आ. भारत भालके यांनी ही घटना संतापजनक असून आदिमानवाच्या काळातही अशा घटना घडल्या नसल्याचे सांगितले. नाथपंथी डवरी समाज हा शांतताप्रिय समाज असून, राईनपाडा येथे पाच जणांची झालेल्या हत्येने काळिमा फासण्याचे काम केल्याचे सांगितले. येत्या अधिवेशनात आपण स्थगन प्रस्तावाद्वारे या पाच जणांना न्याय मिळावा म्हणून मागणी करणार असल्याचे सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घडलेली घटना निषेधार्ह असून, मृतांना शासकीय नियमाप्रमाणे मदत दिली जाईल असे सांगितले. त्याशिवाय नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या सर्व प्रश्नांसाठी बैठक बोलावू असेही सांगितले.

मात्र नातेवाईक लेखी आश्वासनाशिवाय मृतदेह हलविले जाणार नसल्याचे सांगितले. वाढलेला संताप पाहून जिल्हाधिकाºयांनी लेखी पत्र दिल्यानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मृतदेहाची बिकट अवस्था- मंगळवेढा शहरात होणाºया आंदोलनाची स्थिती पाहून पोलिसांनी नगर, टेंभुर्णी, सांगोला मार्गे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या घटनेला दोन दिवस लोटल्याने मृतदेहाचा वास सुटल्याने त्या ठिकाणी थांबणे बिकट बनले होते. मृतदेह ताब्यात देताच नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला. ही घटना करणाºयांना फाशी दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचे सांगून पोलिसांवरही आपला राग व्यक्त केला. विशेषत: महिलांमध्ये संताप मोठ्या प्रमाणावर होता.

मंगळवेढ्यात बंदच्राईनपाडा येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवेढ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी शहरातील मारुती मंदिरासमोर मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आ. भारत भालके, नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्यासह नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरDhuleधुळेPandharpurपंढरपूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय