माढा मतदारसंघातील ऑक्सिजन बेडसाठी ४५ लाखाचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST2021-04-29T04:16:41+5:302021-04-29T04:16:41+5:30

सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असून, माढा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा ...

Fund of Rs. 45 lakhs for oxygen bed in Madha constituency | माढा मतदारसंघातील ऑक्सिजन बेडसाठी ४५ लाखाचा निधी

माढा मतदारसंघातील ऑक्सिजन बेडसाठी ४५ लाखाचा निधी

सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असून, माढा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये ऑक्सिजन बेडची वेळेत व्यवस्था होणे आवश्यक आहे. त्यासाठी मौजे आलेगांव (बुद्रूक) उंबरे(पागे), व महाळुंग, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन बेडसाठी ४५ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबाबतची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती आ. बबनराव शिंदे यांनी दिली.

माढा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येचा विचार करता रोपळे व तुंगत येथे तत्काळ कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी आ. बबनराव शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच येथेही ऑक्सिजन बेडसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ. शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Web Title: Fund of Rs. 45 lakhs for oxygen bed in Madha constituency