दरोड्यातील फरार आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:21 IST2021-05-22T04:21:21+5:302021-05-22T04:21:21+5:30

पोलीस निरीक्षक कोकणे यांनी हवालदार संतोष देवकर, तोफिक काझी, चंद्रकांत ढवळे, हनुमंत गवळी यांचे पथक कोंढेज गावात रवाना केले. ...

Fugitive accused in robbery robbed | दरोड्यातील फरार आरोपी गजाआड

दरोड्यातील फरार आरोपी गजाआड

पोलीस निरीक्षक कोकणे यांनी हवालदार संतोष देवकर, तोफिक काझी, चंद्रकांत ढवळे, हनुमंत गवळी यांचे पथक कोंढेज गावात रवाना केले.

सापळा रचून करमाळा पोलीस ठाण्याकडील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी यामधील फरार आरोपी बतुल्या ऊर्फ संदीप जिगऱ्या काळे (रा. दहिगाव) याला अटक केली.

संदीप काळे याच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९२,४५२ अन्वये गुन्हा नोंद असून, करमाळा, टेंभुर्णी, पंढरपूर तालुका, कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरुपाचे नऊ गुन्हे नोंद आहेत.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव करीत आहेत.

---

Web Title: Fugitive accused in robbery robbed