फळमाशी नियंत्रण; सीताफळ छाटणीची गिरवले धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:23 IST2021-07-29T04:23:02+5:302021-07-29T04:23:02+5:30
कुसळंब : बार्शी तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात सीताफळ व आंबा या फळबागेची लागवड होत आहे. कृषी अधिकारी प्राचार्य डॉ. ...

फळमाशी नियंत्रण; सीताफळ छाटणीची गिरवले धडे
कुसळंब : बार्शी तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात सीताफळ व आंबा या फळबागेची लागवड होत आहे. कृषी अधिकारी प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांच्या कार्यशाळेत सीताफळाची लागवड तंत्रशुद्ध पद्धतीने करावी आणि फळमाशी नियंत्रण व छाटणीचे धडे गिरवले.
सरपंच शिवाजी खोडवे व मंडल कृषी अधिकारी विलास मिस्कीन व कृषी पर्यवेक्षक गणेश पाटील उपस्थित होते. कृषी मंडळ अधिकारी यांनी लागवड आणि मिलीबग नियंत्रण फळमाशी नियंत्रण, सीताफळ छाटणीवर मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक गणेश पाटील यांनी उत्पादन प्रक्रियेवर मार्गदर्शन केले. झाडाचा आकार यानुसार योग्य छाटणी करून सीताफळ लागवडीतून प्रतिएकरी पाच लाख रुपयांपर्यंत उत्पादन घेता येऊ शकते, असे सांगत माती परीक्षणाचा सल्ला दिला.
-----
२८ कुसळंब
फळमाशी नियंत्रण व सीताफळ छाटणीवर प्रात्यक्षिकदरम्यान शिवाजी खोडवे, विलास मिस्कीन, गणेश पाटील.