'चिमणी' बचावसाठी सोलापूरात शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 13:21 IST2017-08-11T13:21:38+5:302017-08-11T13:21:41+5:30
सोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळास अडसर ठरणारी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मितीची चिमणी बचावसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत़ चिमणी पाडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला़ हा मोर्चा सात रस्ता येथुन रंगभवनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखाना सभासद मोठया संख्येने सामील झाले होते़

'चिमणी' बचावसाठी सोलापूरात शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळास अडसर ठरणारी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मितीची चिमणी बचावसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत़ चिमणी पाडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला़ हा मोर्चा सात रस्ता येथुन रंगभवनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखाना सभासद मोठया संख्येने सामील झाले होते़
सोलापूर विमानतळ सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे़ या विमानतळास सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी अडसर ठरत आहे़ त्यामुळे मनपाच्या पथकाकडून चिमणी पाडकामाची प्रक्रिया पूर्ण केली आहे़ गुरूवारी चिमणी पाडकामासाठी नाशिकच्या विहान कंपनीच्या ठेकेदारांनी चिमणी कशी पाडायची याबाबतची पाहणी केली़ ही चिमणी पाडू नये यासाठी कारखान्याचे शेतकरी, सभासद शेतकरी, अध्यक्ष, संचालक मंडळासह इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी विरोध केला आहे़ या विरोधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चात कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, महापौर शोभा बनशेट्टी, संचालक सिध्दाराम चाकोते, नगरसेवक आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, संचालक अमर पाटील, शिवशरण पाटील, अशोक देवकते, माजी आमदार दिलीप माने, राजु हौशेट्टी यांच्यासह आदी उपस्थित होते़