बावीच्या तरुणांकडून बार्शीतील निराधारांना मोफत जेवणाचे डबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST2021-06-06T04:17:15+5:302021-06-06T04:17:15+5:30

बार्शी : लॉकडाऊनमुळे रोजगार बंद, उत्पन्नाचे साधन बंद असल्याने, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची भूक शमविण्यासाठी ...

Free lunch boxes for the destitute in Barshi from Bavi youth | बावीच्या तरुणांकडून बार्शीतील निराधारांना मोफत जेवणाचे डबे

बावीच्या तरुणांकडून बार्शीतील निराधारांना मोफत जेवणाचे डबे

बार्शी : लॉकडाऊनमुळे रोजगार बंद, उत्पन्नाचे साधन बंद असल्याने, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची भूक शमविण्यासाठी बार्शी तालुक्यात बावी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा चिटणीस अनिकेत पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी दोन हजार जेवणाचे डबे वाटप केले.

११ मे पासून अनिकेत पाटीलसह त्यांचे सहकारी रत्नदीप कुलकर्णी, दत्ता आगलावे, शुभम आगलावे, अमोल आगलावे यांनी बार्शीतील भगवंत मंदिर, एसटी स्टँड परिसर, कुर्डूवाडी रोड अशा ठिकाणी बेघर लोकांना दिवसभरात डबेवाटप करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत दोन हजार डब्यांचे वाटप केले आहेत. तसेच त्यांनी गावामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गाव निर्जंतुकीकरण केले. गावात सॅनिटायझर व सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी केली.

---

फोटो : ०५ बार्शी फूड

बार्शीतील निराधारांना जेवणाचे डबे वाटप करताना अनिल पाटील आणि त्यांचे सहकारी.

Web Title: Free lunch boxes for the destitute in Barshi from Bavi youth