सुट्टे पैशावरून फसवणूक, तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:03+5:302021-03-26T04:22:03+5:30
वैराग येथील संतोष शिवाजी उगले वय ४१ हा २० मार्च रोजी पांडुरंग महादेव करणावळ ४९ रा. कासारवाडी ता. ...

सुट्टे पैशावरून फसवणूक, तरुणास अटक
वैराग येथील संतोष शिवाजी उगले वय ४१ हा २० मार्च रोजी पांडुरंग महादेव करणावळ ४९ रा. कासारवाडी ता. बार्शी यास दोन हजाराच्या दोन नोटा दाखवून विश्वास संपादन केला. मेडिकलमधून औषध घ्यायचे असे म्हणत सुटे पैशाची मागणी केली. तेव्हा पांडुरंग करणावळ यांनी ५०० रुपयांच्या आठ नोटा दिल्या. पण संतोषने त्या परत न देताच निघून गेला. ही २० रोजी घडली असली तरी शहर पोलिसात २४ मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. त्यानुसार संतोष उगले यास पोलिसांनी अटक केली. यासाठी चंद्रकांत आदलिंगे, सहदेव देवकर, फिरोज बर्गे, अर्जुन गोसावी या पोलिसांना संबंधिताची माहिती मिळताच त्यास अटक केली. त्यास गुरुवारी न्या. आर. एस. धडके यांच्यासमोर उभा करताच एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.