किरकोळ कारणावरून चौघांची महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:22 IST2021-05-12T04:22:57+5:302021-05-12T04:22:57+5:30

राजुरी येथील मालन शिवाजी दबडे या सोमवारी त्यांच्या घरासमोर असताना भावकीतील मंगल मारुती दबडे, वर्षा सदाशिव दबडे, सदाशिव मारुती ...

Four women beaten for minor reasons | किरकोळ कारणावरून चौघांची महिलेला मारहाण

किरकोळ कारणावरून चौघांची महिलेला मारहाण

राजुरी येथील मालन शिवाजी दबडे या सोमवारी त्यांच्या घरासमोर असताना भावकीतील मंगल मारुती दबडे, वर्षा सदाशिव दबडे, सदाशिव मारुती दबडे व अंकुश मारुती दबडे हे संगनमत करून त्यांच्या घरासमोर आले. यावेळी मंगल व वर्षा दबडे यांनी मालन यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मालन यांनी आम्हाला विनाकारण का मारहाण करता, असे विचारले. तू व तुझा मुलगा नामदेव आम्हाला शिव्या का देता, असे म्हणून सदा दबडे व अंकुश दबडे हा मुलगा नामदेव यास पाईप व काठीने पाठीत मारहाण करीत होते. तू येथे कसा राहतो तेच बघतो, असे म्हणून दमदाटी करू लागले. यावेळी भांडणाचा गोंधळ ऐकून अशोक दबडे, सवाबाई चौंडे, रानुबाई दबडे यांनी त्या ठिकाणी येऊन त्यांची भांडणे सोडवासोडवी केली. याबाबत मालन शिवाजी दबडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Four women beaten for minor reasons