चार हजारांची वाळू अन‌् दोन लाखांचा पिकअप जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:21 IST2021-04-24T04:21:58+5:302021-04-24T04:21:58+5:30

कटफळ औट पोस्ट पोलीस कर्मचारी रात्रीच्या गस्तीवर असताना महूद येथील कासाळ ओढ्यात विजय ठोंबरेसह अज्ञात चौघेजण पिकअपमध्ये वाळू ...

Four thousand sand and two lakh pickups seized | चार हजारांची वाळू अन‌् दोन लाखांचा पिकअप जप्त

चार हजारांची वाळू अन‌् दोन लाखांचा पिकअप जप्त

कटफळ औट पोस्ट पोलीस कर्मचारी रात्रीच्या गस्तीवर असताना महूद येथील कासाळ ओढ्यात विजय ठोंबरेसह अज्ञात चौघेजण पिकअपमध्ये वाळू भरत असल्याची माहिती मिळाली होती. त्याअधारे पोलीस उपनिरीक्षक प्रताप वसगडे, फौजदार संजय राऊत, पोलीस हेड काॅन्स्टेबल तानाजी लिंगडे, पोलीस नाईक क्षीरसागर, पोलीस काॅन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे हे कारवाईसाठी गेले असता त्या पाच जणांना पोलीस आल्याची चाहूल लागताच पिकअप जागेवर सोडून सर्वजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी सुमारे २ लाख रुपये किमतीचा एमएच १२/ जेएफ १४४४ या क्रमांकाच्या पिकअपसह ४ हजार रुपयांची अर्धा ब्रास वाळू जप्त केली. याप्रकरणी पोकॉ लक्ष्मण वाघमोडे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी चालक विजय ठोंबरेसह अज्ञात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Four thousand sand and two lakh pickups seized