चाेरट्यांनी सांगोल्यातून टेम्पो पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:28 IST2021-07-07T04:28:13+5:302021-07-07T04:28:13+5:30

सांगोला : चोरट्यांनी दोन लाखांचा टेम्पो चोरुन नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीला सांगोला- मिरज रोडवर घडली. पुजारवाडी येथील सुभाष मारुती ...

The four of them snatched the tempo from Sangola | चाेरट्यांनी सांगोल्यातून टेम्पो पळविला

चाेरट्यांनी सांगोल्यातून टेम्पो पळविला

सांगोला : चोरट्यांनी दोन लाखांचा टेम्पो चोरुन नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीला सांगोला- मिरज रोडवर घडली.

पुजारवाडी येथील सुभाष मारुती बनकर यांची शीतपेय आणि शुद्ध पाण्याची एजन्सी आहे. त्यांनी माल वितरित करण्याकरिता २०१४ मध्ये एक टेम्पो (एम. एच. ४५ / टी. ११५५) विकत घेतला होता. दरम्यान सोमवारी रात्री ९ च्या सुमारास मॅनेजर विजय भगवान बुंजकर (रा. जुना मेडशिंगी रोड सांगोला) यांनी दिवसभर माल वितरित करुन टेम्पो मिरज रोडवर एका हॉटेलच्या मागे उभा केला होता. दरम्यान मंगळवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास सेल्समन समाधान सदाशिव भुसे (रा. सांगोला) हे एजन्सीचा माल भरण्यासाठी गोडाऊन समोर आले असता सदरचा टेम्पो दिसून आला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

Web Title: The four of them snatched the tempo from Sangola