सोलापूरजवळ अपघातात चार जण जागीच ठार
By Admin | Updated: September 27, 2016 16:42 IST2016-09-27T16:42:11+5:302016-09-27T16:42:11+5:30
कुरूलच्या शिवारात स्विफ्ट कारला अज्ञात जड वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत कारमधील चार जण जागीच ठार

सोलापूरजवळ अपघातात चार जण जागीच ठार
ऑनलाइन लोकमत
सोलापूर/ कुरूल, दि. 27 - मोहोळ ते विजापूर या राज्य महामार्गावर कुरूलच्या शिवारात स्विफ्ट कारला अज्ञात जड वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत कारमधील चारजण जागीच ठार तर अन्य एकजण गंबीररित्या जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली़ हा अपघात मंगळवारी पहाटे घडला़
उमाकांत मधुकर शिवशेट्टी (वय ३४), रामा श्रीपती कदम (वय ४७) दोघेही वाघोली ता़ मोहोळ तसेच विनोद दत्तात्रय गायकवाड (वय २८ रा़ कामती बु, ता़ मोहोळ), मनोज पांडूरंग बनसोडे (वय ३२, रा़ पेनूर, ता़ मोहोळ) अशी जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत़ या संदर्भात कामती पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, सोमवार २६ सप्टेंबर रोजी इन्डस टेलीकॉम टॉवर या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली मिटिंग संपवून मयत चौघे कार एमएच १४ सीएस ५१४४ या गाडीतून कामतीकडे परत येत होते़ या दरम्यान कुरूल गावाच्या शिवारात भारत गॅस गोडावूनच्या अलीकडे असलेल्या वळणावर कामतीवरून मोहोळकडे निघालेल्या अज्ञात जड वाहनाने जोरात धडक दिल्याने या चौघांच्या छातीला जोरात मार लागल्याने ते जागीच ठार झाले आहेत़ तर याच गाडीतील लक्ष्मण गणपती फाळके हा गंभीर जखमी झाला असून त्यास सोलापूर येथील खासगी हॉस्पीटल येथे उपचार करण्यात येत आहेत़ यातील मनोज पांडूरंग बनसोडे हा गाडीचा वाहनचालक आहे़
या अपघाताची नोंद कामती पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वाहनचालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास सहा़ पोलीस निरीक्षक संजीव झाडे हे करीत आहेत़ या अपघातानंतर अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, कामती पोलीस स्टेशनचे संजीव झाडे, पोलीस नाईक बोधवड, हेकॉ भारत जाधव, अनंत कोळी यासह आदी सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देवून मदत केली़