चार महिन्यांच्या गरोदर पत्नीला हाकलून दिले

By Admin | Updated: July 29, 2014 01:26 IST2014-07-29T01:26:24+5:302014-07-29T01:26:24+5:30

पोलिसांनी गुन्हा नोंदवला

Four months pregnant wife was released | चार महिन्यांच्या गरोदर पत्नीला हाकलून दिले

चार महिन्यांच्या गरोदर पत्नीला हाकलून दिले


सोलापूर : पैशासाठी चार महिन्यांच्या गरोदर पत्नीचा पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केला. एवढ्यावरच पतीने न थांबता दुसरा विवाहही उरकून टाकला. याप्रकरणी पतीसह चार जणांवर विजापूर नाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
नीता अविनाश साठे (वय-२०, रा. कस्तुरबा बाग, होटगी रोड, सोलापूर) हिने रीतसर फिर्याद दिली आहे. पती अविनाश, सासरा महादेव, सासू लक्ष्मी, (तिघे रा. कस्तुरबा बाग) आणि नणंद वंदना लोखंडे (रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत़ लग्नात काढलेल्या फोटो अल्बमचे पैसे आणि मोटरसायकलचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी आरोपींनी लकडा लावला होता. पैसे न आणल्याने आरोपींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यातच ती गरोदर असताना पतीने घराबाहेर काढले आणि दुसरा विवाह केला.

Web Title: Four months pregnant wife was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.