शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एक किलो पेढ्याच्या खव्यासाठी म्हशीचे चार तर गायीचे साडेपाच लिटर लागते दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:00 IST

पंढरपुरी पेढ्याला भाविकांची पसंती; आषाढीसाठी बाहेरूनही येतात पेढे विक्रेते

ठळक मुद्देआषाढी वारीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतातप्रत्येक वारकरी विठ्ठलाचा प्रसाद म्हणून पंढरपुरातील पेढ्याची खरेदी नक्कीच करतोपंढरीत लाड, कुलकर्णी, देशपांडे या मोठ्या व्यापाºयांसह अनेक लहान-मोठे व्यावसायिक पेढा विक्री करतात

ज्योतिराम शिंदे

पंढरपूर : पेढा तयार करण्यासाठी लागणाºया एक किलो खव्यासाठी म्हशीचे चार लिटर तर गायीच्या साडेपाच लिटर दुधाचा वापर केला जातो, असे पेहे येथील खवा व्यावसायिक पिंटू पाटील यांनी सांगितले.

पंढरपुरातील काही व्यापारी येथीलच खवा बाजारासह सोलापूर, येरमाळा येथून खव्याची खरेदी करतात. हा पेढा तयार करण्यासाठी लागणारा खवा वातानुकूलित वातावरणात ठेवला तर साधारणत: दोन ते तीन आठवडे चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतो़ या खव्यापासून बनविलेला पेढा साधारण एक ते दीड महिना खाण्यायोग्य राहतो, असे स्थानिक व्यापाºयांनी सांगितले.

आषाढी वारीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. यावेळी प्रत्येक वारकरी विठ्ठलाचा प्रसाद म्हणून पंढरपुरातील पेढ्याची खरेदी नक्कीच करतो. हा पेढा तयार करण्यासाठी लागणारा खवा वातानुकूलित वातावरणात ठेवला तर दोन ते तीन आठवडे चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतो़ या खव्यापासून बनविलेला पेढाही एक ते दीड महिना खाण्यायोग्य असतो.

पंढरीत लाड, कुलकर्णी, देशपांडे या मोठ्या व्यापाºयांसह अनेक लहान-मोठे व्यावसायिक पेढा विक्री करतात. पंढरीत शनिवार आणि मंगळवार असे दोन दिवस खव्याचा बाजार भरतो. या बाजारामध्ये खेडभाळवणी, मेंढापूर, खेडभोसे, व्होळे, गुरसाळे, पेहे, बार्डी येथील शेतकरी म्हशीच्या दुधापासून घरीच खवा तयार करून बाजारात विक्रीसाठी आणतात. तसेच काही खवा विक्रेते स्थानिक शेतकºयांकडून दुधाची खरेदी करून मशीनद्वारेही खवा तयार करतात. आषाढी वारीपूर्वी दोन दिवस कर्नाटक, उस्मानाबाद, कुंथलगिरी, बीडसह मराठवाड्यातूनही काही व्यावसायिक पेढा विक्रीसाठी आणतात.

आषाढी वारीच्या कालावधीमध्ये प्रत्येक पेढे विक्रेते साधारणत: १०० ते १२५ किलोपर्यंत पेढ्याची विक्री करतात. यातून सात-आठ दिवसांच्या वारीकाळात सुमारे ४५ ते ५० टन पेढ्याची विक्री केली जाते.

खव्यातील साखरेच्या प्रमाणानुसार दर्जा- खव्यामध्ये किती साखर वापरायची याचे प्रमाण ठरलेले असते़ त्यानुसारच पेढ्याचा दर्जा ठरतो़ उत्कृष्ट दर्जाचा पेढा तयार करण्यासाठी ७५ टक्के खवा आणि २५ टक्के साखरेचा वापर केला जातो. मध्यम दर्जाचा पेढा तयार करण्यासाठी ५० टक्के खवा आणि ५० टक्के साखरेचा वापर करतात. याबरोबरच २५ टक्के खवा आणि ७५ टक्के साखरेचा वापर करूनही काही व्यापारी पेढा तयार करतात. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी