लांडग्याच्या हल्ल्यात हिंगणीमध्ये चार शेळ्या मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST2021-05-20T04:24:18+5:302021-05-20T04:24:18+5:30

उजनी लाभक्षेत्रातील हिंगणी येथील गणेश बाबर गावाजवळील वस्तीवर बुधवारी सकाळी नऊच्या दरम्यान शेळ्या चरण्यासाठी शेतात गेला होता. या शेळ्‍यांवर ...

Four goats killed in wolf attack in Hingani | लांडग्याच्या हल्ल्यात हिंगणीमध्ये चार शेळ्या मृत्युमुखी

लांडग्याच्या हल्ल्यात हिंगणीमध्ये चार शेळ्या मृत्युमुखी

उजनी लाभक्षेत्रातील हिंगणी येथील गणेश बाबर गावाजवळील वस्तीवर बुधवारी सकाळी नऊच्या दरम्यान शेळ्या चरण्यासाठी शेतात गेला होता. या शेळ्‍यांवर लांडग्याच्या कळपाने हल्ला केला. यात तीन शेळ्या जागीच मृत्यू पावल्या. तर एक शेळी तासाभराने मृत्युमुखी पडली.

शेळ्यांच्या ओरडण्याने वस्तीवरील शिवकांता बाबर व लहान मुले शेळ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होती. त्यांच्या ओरडण्याने लांडग्यांनी जवळील उसाच्या शिवारात धूम ठोकली.

लांडग्याच्या झटापटीत गंभीर जखमी झालेल्या चार शेळ्या मृत्युमुखी पडल्याने बाबर यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. सोमनाथ खरात व मनीष यादव यांनी पंचनामा केला आहे. लांडग्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील गाव व वाड्या वस्तीवरील शेतकऱ्यात घबराट निर्माण झाली आहे.

------

Web Title: Four goats killed in wolf attack in Hingani