सहा जणांकडून पती-पत्नीसह चार मुलांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST2021-06-27T04:15:40+5:302021-06-27T04:15:40+5:30

उदनवाडी येथील सुखदेव ईश्वर गडदे हे पत्नी, चार मुलांसह शेतात डाळिंबाची बाग फवारणी करीत होते. त्यादरम्यान भावकीतील सजाबाई विठ्ठल ...

Four children, including a husband and wife, were beaten by six men | सहा जणांकडून पती-पत्नीसह चार मुलांना मारहाण

सहा जणांकडून पती-पत्नीसह चार मुलांना मारहाण

उदनवाडी येथील सुखदेव ईश्वर गडदे हे पत्नी, चार मुलांसह शेतात डाळिंबाची बाग फवारणी करीत होते. त्यादरम्यान भावकीतील सजाबाई विठ्ठल गडदे हिने त्यांच्या शेतातील गवताचे चगळ सुखदेव गडदे यांच्या शेतात टाकले. म्हणून त्यांनी तुम्ही तुमच्या शेतातील चगळ आमच्या शेतात का टाकता, असे विचारले. त्यावेळी समाधान विठ्ठल गडदे, अंजली समाधान गडदे, विठ्ठल शंकर गडदे, दादासाहेब तातोबा माने व अजित तातोबा माने हे शिवीगाळ, दमदाटी करू लागले. दरम्यान, समाधान याने तेथेच पडलेला दगड घेऊन सुखदेव गडदे यांना मारून जखमी केले. दादासाहेब माने यांनी लोखंडी गजाने कपाळावर, हातावर मारहाण केली. यावेळी अजित माने यांनी काठीने त्यांच्या पाठीवर मारहाण केली, तर अंजली गडदे, विठ्ठल गडदे व सजाबाई गडदे या तिघांनी पती-पत्नीसह चार मुलांना शिवीगाळी, दमदाटी करीत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याबाबत सुखदेव ईश्वर गडदे यांनी सहा जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Four children, including a husband and wife, were beaten by six men