निर्भयाला जबरदस्तीने नेताना चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:36 IST2021-05-05T04:36:12+5:302021-05-05T04:36:12+5:30

तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीचे फेसबुकवरून पुणे येथील एका मुलाबरोबर प्रेमसंबंध जुळले. त्यावरून सुमित सुनील सावंत (२१, रा. ...

Four arrested for forcibly taking Nirbhaya | निर्भयाला जबरदस्तीने नेताना चौघे ताब्यात

निर्भयाला जबरदस्तीने नेताना चौघे ताब्यात

तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीचे फेसबुकवरून पुणे येथील एका मुलाबरोबर प्रेमसंबंध जुळले. त्यावरून सुमित सुनील सावंत (२१, रा. पारखे वस्ती वाकड, पुणे), फ्रान्सेस भास्कर दास (२८, रा. वारजे, जि. पुणे), प्रतिकेश अरुण वीर (२८, रा. पिरगुट लवासा रोड पुणे), सचिन राजेश सोनवणे (१९, रा. मोशी, ता. आळंदी) हे एमएच-०४ डिजी-६५२१ ही चारचाकी गाडी घेऊन अक्कलकोट तालुक्यातील एका गावी आले. त्यांनी त्या निर्भयाला तुझ्याबरोबर लग्न करून घेतो, म्हणून मित्रांच्या साथीने पुणे येथे घेऊन जात होता.

सध्या संचारबंदी असल्याने सर्वत्र नाकाबंदी आहे. सोलापूर येथील एमआयडीसी नाकाबंदी येथे पोलिसांनी पकडून चौकशी केली असता, पितळ उघडले पडले. त्यावरून अक्कलकोट पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर २ एप्रिल रोजी वरील सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत वाहन जप्त केले आहे. याबाबत निर्भयाच्या वडिलांनी फिर्याद दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींना येथील न्या. शरद गवळी यांच्यासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Four arrested for forcibly taking Nirbhaya