शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Balasaheb Sarwade Case : मनसेच्या बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील चार आरोपींना पकडले; तासवडे टोलनाक्यावर पोलिसांची सापळा रचून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:35 IST

Balasaheb Sarwade Case : सोलापुरातील मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Balasaheb Sarwade Case : सोलापुरातील मनसे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी आज तासवडे टोल नाक्यावर पकडले.  तळबीड पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या आरोपींना पुढील तपासासाठी सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदेंचा भाजप प्रवेश, फडणवीस- शिंदेंमध्ये डील; सुजात आंबेडकरांचा खळबळजनक दावा

राज्यात महानगर पालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरवदे यांची हत्या झाली.  निवडणुकीत उमेदवारीच्या वादातून मनसे विद्यार्थीसेनेचा शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदेंची हत्या झाली होती. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली होती. या खून प्रकरणातील   शंकर  शिंदे, सुनील शिंदे, आलोक शिंदे आणि महेश भोसले,हे चार संशयित फरार झाले होते. दरम्यान, आज (सोमवार) सकाळी तळबीड पोलिसांनी कारवाई केली.

मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली

अर्ज माघारी घेण्याच्या वादातून सोलापूरात मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे सोलापूर शहरात खळबळ माजली. या सरवदे कुटुंबाची आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेट घेतली. 

अमित ठाकरे यांनी सोलापूरात बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाला भेट देत सांत्वन केले. मात्र याठिकाणी बाळासाहेब यांच्या लहान चिमुकल्यांचा आक्रोश पाहून अमित ठाकरेही गहिवरले. बाळासाहेब सरवदे यांची लहान मुलगी ढसाढसा रडत होती. माझे पप्पा मला सोडून गेले असं म्हणत ती आर्त हाक देत होती. हे दृश्य पाहून कुणाचेही मन हेलावेल. अमित ठाकरे यांच्यासमोर हात जोडून ही चिमुकली वडिलांच्या आठवणीने अक्षरश: कोलमडून पडली. अमित ठाकरे तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होते मात्र या क्षणांनी तेदेखील निःशब्द झाले. या घटनेचा व्हिडिओ तिथे काहीजण कॅमेऱ्यात कैद करत होते. मात्र ही बाब अमित ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सर्व रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तींना घराच्या बाहेर पाठवले. परंतु आता यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून कुणाचेही डोळे पाणावतील.

अमित ठाकरे संतापले

बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट घेतल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी संतप्त भूमिका मांडली. राजकारणाची पातळी इतक्या खालच्या थराला गेली आहे. पैशाचे आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यापर्यंत ठीक होते परंतु आता लोकांचा खून करेपर्यंत मजल गेली, ते फक्त निवडणुकांसाठी..मी इथे आलोय तसं देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी येथे येऊन इथली परिस्थिती काय आहे ते पाहिले पाहिजे. अशा निवडणुका असतील तर आम्हाला निवडणुका नको, आम्ही सगळे अर्ज परत घेतो. तुम्ही जिंका. ती मुलगी रडत होती. अशी परिस्थिती महाराष्ट्रातली तुम्ही आणून ठेवली असं त्यांनी म्हटलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Balasaheb Sarwade Murder Case: Four Arrested at Tasawade Toll Plaza

Web Summary : Four suspects in the Balasaheb Sarwade murder case were arrested at Tasawade toll plaza. The MNS leader's murder, linked to election rivalry, prompted a visit from Amit Thackeray, who criticized the political climate. Police are investigating further.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस