सापडले! वर्षभरात हरवलेले बारा मोबाईल पोलिसांनी केले जप्त
By रवींद्र देशमुख | Updated: April 5, 2023 15:56 IST2023-04-05T15:56:15+5:302023-04-05T15:56:24+5:30
सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध कंपन्यांचे हरविलेले १ लाख २० हजार रूपये किंमतीचे १२ मोबाईल हस्तगत करण्यात ...

सापडले! वर्षभरात हरवलेले बारा मोबाईल पोलिसांनी केले जप्त
सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध कंपन्यांचे हरविलेले १ लाख २० हजार रूपये किंमतीचे १२ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
दरम्यान, सन २०२२ मध्ये १० व सन २०२३ मध्ये २ विविध कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट हरविल्याची नोंद सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात रहात असलेल्या नागरिकांनी केली होती. हरविलेले मोबाईल हॅन्डसेटचा शोध घेऊन ते संबंधीत नागरिक यांना परत देण्याच्या मागावर गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक धाड टाकून १ लाख २० हजार रूपये किंमतीचे मोबाईल हॅन्डसेट हस्तगत करून ते संबंधित नागरिकांना सुपुर्द करण्याची कार्यवाही सुरू आहे.