वीट खूनप्रकरणी आरोपी सापडला; चार दिवसाची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:42 IST2021-02-21T04:42:16+5:302021-02-21T04:42:16+5:30

संशयीत आरोपी गाडे हा खून प्रकरणातील महिला भाग्यश्री गाडे यांच्या जमिनीच्या शेजारचा आहे. त्याने तिच्यावर वाईट नजर ठेवून हे ...

Found guilty in brick murder case; Four days in police custody | वीट खूनप्रकरणी आरोपी सापडला; चार दिवसाची पोलीस कोठडी

वीट खूनप्रकरणी आरोपी सापडला; चार दिवसाची पोलीस कोठडी

संशयीत आरोपी गाडे हा खून प्रकरणातील महिला भाग्यश्री गाडे यांच्या जमिनीच्या शेजारचा आहे. त्याने तिच्यावर वाईट नजर ठेवून हे कृत्य केले आहे. त्याची चप्पल घटनास्थळी सापडली. त्यावरून पोलीसांनी त्याचा शोध केला असता, या खुनाचे धागेदोरे सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री अटक केली. शनिवारी सकाळी ११ वाजता या संशयितास न्यायालयात आणले. त्यावेळी तपासी अमंलदार पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी हा गंभीर गुन्हा असून, त्या सखोल शोध घेण्यासाठी सात दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. तसेच शासकिय अभियोक्ता ॲड. सचिन लुणावत यांनी याच बाबी मांडत पोलीस कोठडीची मागणी केली. संशयिताचे वकील ॲड. अलीम पठाण यांनी सरकार पक्षाचे आरोप खोटे असून संशयिताकडून काहीही जप्ती करावयाचे नसल्याने न्यायालयीन कोठडी मंजूर करावी अशी मागणी केली. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून न्यायालयाने संशयितास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Found guilty in brick murder case; Four days in police custody