माजी खासदार धर्मण्णा सादूल यांचे निधन; अलीकडेच BRS मध्ये सहभागी झाले होते

By बाळकृष्ण दोड्डी | Published: December 13, 2023 12:14 PM2023-12-13T12:14:18+5:302023-12-13T12:14:35+5:30

1989 साली ते पहिल्यांदा काँग्रेसकडून खासदार झाले.

Former MP Dharmanna Sadul passed away; Recently joined BRS | माजी खासदार धर्मण्णा सादूल यांचे निधन; अलीकडेच BRS मध्ये सहभागी झाले होते

माजी खासदार धर्मण्णा सादूल यांचे निधन; अलीकडेच BRS मध्ये सहभागी झाले होते

सोलापूर : काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा मोंडय्या सादूल (वय ८३) यांचे बुधवारी पावणे बारा दरम्यान एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. काँग्रेसला सोडचिट्टी देऊन काही महिन्यांपूर्वी त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये सामील झाले. 
तब्येतीच्या कारणामुळे बीआरएस मध्ये सुद्धा ते सक्रिय नव्हते.

1989 साली ते पहिल्यांदा काँग्रेसकडून खासदार झाले. त्यानंतर, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याही काळात ते खासदार होते. नरसिंह राव यांचे ते निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जायचे. काँग्रेसकडून ते दोनदा खासदार झाले.

Web Title: Former MP Dharmanna Sadul passed away; Recently joined BRS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.