शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 08:19 IST

आपल्या सर्वांचे आधार, ज्येष्ठ नेते, माजी आमदार आदरणीय श्री सुधाकर पंत परिचारक यांचे काल रात्री साडे अकराच्या (11.35 PM)सुमारास पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे दुःखद निधन झाले.

ठळक मुद्देसुधाकरपंत परिचारक यांना एकेकाळी पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे पाच वेळा पंढरपूरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कामही पाहिले होतेभाजपने त्यांना तिकीट दिल्याने सुधाकरपंत रिंगणात उतरले मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते

सोलापूर/ मुंबई - सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक याचे पुण्यात निधन झाले आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री 11.35 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 85 वर्षांचे होते. सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. 

सुधाकरपंत परिचारक यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर पंढरपुरात उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र काल संध्याकाळी अचानक त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यातच त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. अखेर काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी १०.३० वाजता त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत.            

सुधाकरपंत परिचारक यांचा परिचय

सुधाकरपंत परिचारक यांनी 2019 मध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

सुधाकरपंत परिचारक हे दहा वर्ष राष्ट्रवादीचे आमदार होते. 2009 मध्ये सुधाकरपंत परिचारक यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीरही झाली होती. मात्र ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंतांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु मोहिते पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला.

सुधाकरपंत परिचारक यांना एकेकाळी पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी पाच वेळा पंढरपूरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कामही पाहिले होते.

गेल्या दहा वर्षांच्या काळात सुधाकरपंत निवडणुकांपासून लांब राहिले. पंचाहत्तरी गाठल्यानंतर इतरांना संधी देण्यासाठी सुधाकरपंतांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ करणं पसंत केलं होतं. 2014 च्या निवडणुकीपासून परिचारकांनी राष्ट्रवादीसोबतही काडीमोड घेतला. मात्र कार्यकर्त्यांचा जोश पाहून गेल्या वर्षी सुधाकरपंतांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. भाजपने तिकीट न दिल्यास अपक्ष लढा, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, मात्र भाजपने त्यांना तिकीट दिल्याने सुधाकरपंत रिंगणात उतरले मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPandharpurपंढरपूरSolapurसोलापूरDeathमृत्यूPrashant Paricharakप्रशांत परिचारक