निपाणीचे माजी आमदार रघुनाथराव कदम यांचे निधन

By Admin | Updated: December 29, 2014 00:03 IST2014-12-28T22:26:16+5:302014-12-29T00:03:36+5:30

महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवार, एच. विश्वनाथ, माजी मंत्री एच.के. पाटील, सदाशिवराव मंडलिक यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी संबध होते.

Former MLA of Nipani, Raghunathrao Kadam passed away | निपाणीचे माजी आमदार रघुनाथराव कदम यांचे निधन

निपाणीचे माजी आमदार रघुनाथराव कदम यांचे निधन

निपाणी : निपाणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि बहुजन समाजाचे नेते रघुनाथराव विठ्ठलराव कदम (वय ७८) यांचे आज, रविवारी पहाटे निधन झाले. रघुनाथराव कदम यांनी १९७२ साली कॉँग्रेसतर्फे विधानसभेची निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. त्यांनी आमदारकीच्या कारकिर्दीत निपाणीसह दुर्लक्षित भागांचा विकास केला. राजकीय, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्वाचे आहे. महाराष्ट्राचे जेष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी शिक्षण मंत्री एच. विश्वनाथ, माजी मंत्री एच.के. पाटील, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी त्यांचे जवळचे संबध होते. सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून त्यांची अंत्ययात्रा काढली. यावेळी खासदार प्रभाकर कोरे, प्रकाश हुक्केरी, आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, मधुकर नलवडे, आमदार महांतेश कवटगीमठ, कॉँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Former MLA of Nipani, Raghunathrao Kadam passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.