शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग समित्यांचे गठण; आता सोलापुरातील ‘कोरोना’ रोखण्याची जबाबदारी नगरसेवकांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:31 IST

सोलापूर महापालिका; उपजिल्हाधिकारी, विभागीय अधिकाºयांच्या संपर्कात राहून करायची कामे

ठळक मुद्देशहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. लॉकडाऊन तर आहेच. शिवाय प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवांवर बंधने आयुक्तांनी शहर स्तरावर शहर समिती व प्रभागस्तरावर नगरसेवक, स्वयंसहायता बचत गट, प्रशासकीय अधिकारी यांची समिती गठीत केली

सोलापूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी नगरसेवकांवर टाकण्यात आली आहे. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी यासाठी नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली २६ प्रभाग समित्यांचे गठण केले आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. लॉकडाऊन तर आहेच. शिवाय प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवांवर बंधने आहेत. प्रशासनाकडून या क्षेत्रात कामे केली जात आहेत, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात नगरसेवकांना सहभागी करून घ्या, अशी मागणी सर्वपक्षीय गटनेत्यांनी केली. त्यानुसार आयुक्तांनी शहर स्तरावर शहर समिती व प्रभागस्तरावर नगरसेवक, स्वयंसहायता बचत गट, प्रशासकीय अधिकारी यांची समिती गठीत केली आहे. या समितीने आपल्या प्रभागात विविध उपाययोजना करून घ्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून काही नगरसेवक रस्त्यावर उतरुन कामे करीत आहेत. लोकांना मदत करीत आहेत, परंतु काही नगरसेवकांनी अद्याप नागरिकांना सामोरे जायची तयारी दाखवली नाही. आयुक्तांच्या निर्देशानंतर मात्र या नगरसेवकांना लोकांना सामोरे जावे लागणार आहे.

समितीने नेमके काय करायचे...!- प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, मास्क वाटप, व्हिटॅमीन गोळ्या वाटप करण्यासाठी मार्गदर्शन करणे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याच्या कामात प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करणे, प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत काम करणे, खासगी डॉक्टरांच्या मदतीने ओपीडी चालू करणे, शहराबाहेरुन येणाºया नागरिकांवर आणि होम क्वारंटाईन व्यक्तींबाबत मनपा आणि पोलीस प्रशासनाला अवगत करणे, ज्येष्ठ नागरिकांची माहिती उपलब्ध करून निवारा केंद्राकडे पाठवण्याबाबत सहकार्य करणे. या कामांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमले आहेत. त्यांच्या संपर्कात राहूूनही कामे करावीत, असे आयुक्तांनी सुचवले आहे.

प्रभाग समितीमध्ये यांचा समावेश - प्रभाग क्रमांक निहाय : प्रभाग क्र. १. रवी गायकवाड, २. डॉ. किरण देशमुख ३. सूर्यकांत पाटील ४. विनायक विटकर ५. गणेश पुजारी ६.गणेश वानकर ७. देवेंद्र कोठे ८. शोभा बनशेट्टी ९. नागेश वल्याळ १०. प्रथमेश कोठे ११. अनिता मगर १२. शशिकला बत्तुल १३. सुनील कामाठी १४. तौफिक हत्तुरे १५. विनोद भोसले १६. फिरदोस पटेल १७. रवी कय्यावाले १८. शिवानंद पाटील १९. श्रीनिवास करली २०. मौलाली सय्यद २१. अजहर हुंडेकरी २२. किसन जाधव २३. सुनीता रोटे २४. राजेश काळे २५. वैभव हत्तुरे २६. शिवलिंग कांबळे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस