वनविभागाच्या सुरक्षा रक्षकास काठीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST2021-09-14T04:26:24+5:302021-09-14T04:26:24+5:30
हटकर-मंगेवाडी येथील अक्षय शामराव मोरे हा हटकर मंगेवाडी, पाचेगाव, राजुरी, निजामपूर येथील वनविभागात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. घटनेच्या ...

वनविभागाच्या सुरक्षा रक्षकास काठीने मारहाण
हटकर-मंगेवाडी येथील अक्षय शामराव मोरे हा हटकर मंगेवाडी, पाचेगाव, राजुरी, निजामपूर येथील वनविभागात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. घटनेच्या आधी दोन दिवस वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जनावरे राखण करणाऱ्या व्यक्तींना ५०० रुपयांप्रमाणे केलेला दंड वसूल करीत होता. दरम्यान, शनिवारी दुपारी गावातील काही लोक फॉरेस्टमध्ये जनावरे घेऊन चरण्यासाठी आले होते.
यावेळी अक्षय मोरे याने तुम्हाला आमच्या साहेबांनी दंड केला आहे. तरीही तुम्ही जनावरे का घेऊन आला, तुमची जनावरे वन कार्यक्षेत्रातून बाहेर काढा असे म्हणाला. त्यानंतर उमेश चव्हाण, बापू चव्हाण, दादा भुसनर, सौदा शेख, नवनाथ चव्हाण, शशिकांत पुजारी यांनी त्यास जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर उमेश चव्हाण, शशिकांत पुजारी, बापू चव्हाण यांनी त्यांच्याकडून दंडाचे वसुली केलेले चार ते पाच हजार रुपयेही काढून घेऊन सर्वजण पसार झाले. याबाबत अक्षय मोरे यांनी सहाजणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.