शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

उजनीप्रमाणेच कुरनूर धरणावर परदेशी पक्ष्यांचा मेळा; ९० विविध प्रजातीचे पक्षी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:47 IST

नेचर कॉन्झर्व्हेशनकडून निरीक्षण; उजनी धरण परिसराप्रमाणे अक्कलकोट तालुक्यातही परदेशी पक्ष्यांचा मेळा ! 

ठळक मुद्देनेचर कॉन्झर्व्हेशनच्या सदस्यांनी केलेल्या पक्षी निरीक्षणात जवळपास ९० प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन झालेआॅस्प्रे हा शिकारी पक्षीदेखील कुरनूर धरणावर पोहोचलायसोलापुरातील होटगी, हिप्परगा या तलावांपेक्षाही कुरनूर धरण परिक्षेत्राचे आवार मोठे असल्याने या येथे मुबलक प्रमाणात जैवविविधता आढळते

शंभुलिंग अकतनाळ

चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेले कुरनूरचे धरण आता दुर्मिळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी पोषक ठरु लागले आहे. धरणावर या मोसमात एशियन पाईड स्टर्लिंग, डोमेसियल क्रेन, आॅस्प्रे या जातीच्या दुर्मिळ परदेशी पक्ष्यांबरोबरच तब्बल ९० विविध प्रजातींचा मेळा जमला आहे. पक्षी निरीक्षकांना ही पर्वणी लाभली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात कुरनूर धरणावर या पक्ष्यांचे मोठे वास्तव्य झाल्याचे नेचर कॉन्झर्व्हेशनचे शिवानंद हिरेमठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, सोलापूर या निसर्ग संवर्धन करणाºया संस्थेतर्फे बर्डमॅन डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी कुरनूर धरण क्षेत्रामध्ये पक्षीनिरीक्षण उपक्रम राबविला़ जे पक्षी आपल्याला शहरामध्ये आढळत नाहीत असे कवडी मैना, करड्या डोक्याची मैना, गुलाबी मैना, गुलाबी चटक, माळ मुनिया, लालमुनिया, काळ्या डोक्याची मनोली, पांढºया भुवयाची बुलबुल, हळद्या, पाणकावळा, धोबी, नदी सुरय अशा अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन कुरनूर धरण क्षेत्रामध्ये झाले. सोलापुरातील होटगी, हिप्परगा या तलावांपेक्षाही कुरनूर धरण परिक्षेत्राचे आवार मोठे असल्याने या येथे मुबलक प्रमाणात जैवविविधता आढळते. त्यामुळे हा भाग सुजलाम् सुफलाम् असल्याने हे दुर्मिळ पक्षी आढळून आले आहेत.

नेचर कॉन्झर्व्हेशनच्या सदस्यांनी केलेल्या पक्षी निरीक्षणात जवळपास ९० प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन झाले. आॅस्प्रे हा शिकारी पक्षीदेखील कुरनूर धरणावर पोहोचलाय. त्याचे आवडते खाद्य मासे आहे. हा एक विश्वव्यापी पक्षी असून, याचे प्रजनन केवळ अमेरिकेतील भौगोलिक परिस्थितीत होते. वास्तविक हा पक्षी आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळत नाही. या अगोदर सलग तीन वर्षे कुरनूर धरणावर आढळलेला आहे आणि यावर्षी परत आलेला असून, याचे वास्तव्य या परिसरात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर येथे पक्षीनिरीक्षण केंद्र व्हावे, अशी अपेक्षा पक्षी निरीक्षकांकडून होऊ लागली आहे.

या कारणामुळे होतेय पक्ष्यांचे आगमन- धरण परिसरातील जुन्या बावकरवाडी गावातील पडकी घरे, आजूबाजूच्या शेतात मिळणारे खाद्य, धरणाची पोषक अशी भौगोलिक परिस्थिती आणि व्याप्त स्वरूपातील मैदानी प्रदेशामुळे कुरनूरचे धरण काही वर्षात दुर्मिळ पक्ष्यांसह नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्यांचे माहेरघर बनत चालले आहे.

यांनी केले पक्षी निरीक्षण- यावेळी नेचर कॉन्झर्वेशनचे भरत छेडा, शिवानंद हिरेमठ, नीलकंठ पाटील, सचिन पाटील, रत्नाकर हिरेमठ, विनायक दुधगी, संतोष धाकपाडे, अजित चौहान, तरुण जोशी, प्रतीक तलवाड, दाजी क्षीरसागर, सोमानंद डोके, महादेव कुंभार, अमोल मिस्कीन, बसवराज बिराजदार, आदित्य घाडगे, विनय गोटे, शुभम बाबानगरे, गणेश बिराजदार, रत्नाकर हिरेमठ, अजय हिरेमठ, सिद्धांत चौहान, राकेश धाकपाडे, माही जोशी, रुद्रप्रताप चौहान, प्राजक्ता धनशेट्टी इ. या सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

टॅग्स :Solapurसोलापूरbirds sanctuaryपक्षी अभयारण्यUjine Damउजनी धरणwater parkवॉटर पार्कakkalkot-acअक्कलकोट