ट्रक्टरचं भाडं मागितल्यानं चौघांनी मिळून तरुणाला धू धूतलं
By विलास जळकोटकर | Updated: June 19, 2023 18:38 IST2023-06-19T18:38:08+5:302023-06-19T18:38:26+5:30
सोलापूर : ट्रक्टरचे भाडे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला चौघांनी मिळून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. रविवारी दुपारी चारच्या ...

ट्रक्टरचं भाडं मागितल्यानं चौघांनी मिळून तरुणाला धू धूतलं
सोलापूर : ट्रक्टरचे भाडे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला चौघांनी मिळून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. रविवारी दुपारी चारच्या सुमारास रड्डे (ता. मंगळवेढा) गावात ही घटना घडली.
सुनील बसवंत बिराजदार (वय- २१, चिक्कलगी, ता. मंगळवेढा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. यातील जखमी सुनील शेतामध्ये ट्रक्टरद्वारे मशागत केलेले बील मागण्यासाठी रविवारी दुपारी ४ च्या सुमारास रड्डे येथे गेले असता सुभाष शिलेदार, संजय शिलेदार यांच्यासह चौघांनी मिळून लाथाबुक्क़्याने मारहाण केली.
यात सर्वांगाला मुका मार लागल्याने मंगळवेढा सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेच नोंद झाली आहे.