शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

संचारबंदीत अन्नाची ओढ; भाकरी आली रे... म्हणत भुकेल्यांची गाडीमागे धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 12:54 IST

संचारबंदीत अन्नाची ओढ असणाºया या मंडळींचा मिळेल ते खायचं आणि दिवस काढायचा असा प्रकार सुरू आहे. 

ठळक मुद्दे रेल्वे स्टेशन, भैय्या चौक मार्गावरील फुटपाथ, डॉ. आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर, कुष्ठरोग (लेप्रसी) वसाहत या भागात अनेक निराधार दररोज जेवणाची वाट पाहत असतातसध्या कोरोना का काय तो रोग आलाय.., सोलापूर बंद झालंय. रोज मागून खातो मात्र सध्या मागायची सोय राहिली नाही. पोट भागवायचं कसं असा प्रश्न आम्हाला रोज पडतो

संताजी शिंदे

सोलापूर : भाकरी आली रे चला... असे म्हणत भर उन्हात पोटाची भूक भागविण्यासाठी, रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसलेले निराधार अन्न वाटप करणारी गाडी पाहताच पळत सुटले. संचारबंदीत अन्नाची ओढ असणाºया या मंडळींचा मिळेल ते खायचं आणि दिवस काढायचा असा प्रकार सुरू आहे. 

मार्च महिन्यात संचारबंदीला सुरुवात झाली. दि. ३१ मार्चपर्यंत जाहीर झालेली संचारबंदी दि. १ एप्रिलपासून १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. नंतर पुन्हा दि. १५ ते ३० एप्रिलपर्यंत ही संचारबंदी वाढली. सुरुवातीच्या काळात बहुतांश सामाजिक संघटनांच्या वतीने निराधारांना अन्नदान करण्यात आले. मात्र हळूहळू अन्नदान करणारे हात आखडते झाले. सध्या बोटांवर मोजण्याइतक्या काही संस्था यथा शक्य ते अन्न वाटप करीत आहेत. रविवारी दुपारी दोननंतर शहरात संचारबंदी कडक करण्यात आली आहे. त्यामुळे निराधारांचे मोठे हाल होत आहेत. मार्केट, किराणा दुकान बंद असल्याने सकाळपासून रस्त्यावर कोणी दिसत नव्हते. रस्त्याच्या कडेला बसलेले निराधार येणाºया-जाणाºयांकडे मोठ्या आशेने पाहत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अन्न वाटप करणारी व्हॅन सिद्धेश्वर मंदिराजवळ आली. तेव्हा दोन्ही रस्त्यांच्या कडेला बसलेले निराधार एक एक करून व्हॅनच्या दिशेने धावू लागले. व्हॅनमधून एक व्यक्ती येणाºया प्रत्येकाला अन्नााचे पाकीट देत होते. 

हा प्रकार इतरांच्या लक्षात येताच महिला, वृद्ध व अपंग व्हॅनकडे येत होते. पळत असलेले निराधार अन्नाचे पाकीट हातात पडल्यानंतर मोठ्या समाधानाने हळूहळू चालत निघून जात होते. एकवेळच्या अन्नाचा प्रश्न मिटला, असे म्हणत सुटकेचा नि:श्वास टाकत होते. 

भूक काय असते याची जाणीव आहे : हिंगमिरे- माणसाला जगायचं असेल तर त्याला जेवणाची आवश्यकता असते. आज शहरात परिस्थितीमुळे रस्त्यावर दुर्दैवी जीवन जगणाºयांची संख्याही मोठी आहे. सर्वसामान्य माणूस घरात चटणी-भाकर खाऊन बसू शकतो, मात्र निराधार मंडळींना तेही शक्य होत नाही. घर नाही, दार नाही, रस्त्याच्या कडेला आसरा पाहून ही मंडळी भुकेल्या नजरेने आमची वाट पाहत असतात. भूक म्हणजे काय असते याची जाणीव मला असल्याने मी दररोज यथा शक्य अन्नदान करतो. जनावरांना चाराही देतो, अशी माहिती व्यावसायिक वीरेंद्र हिंगमिरे यांनी दिली. 

साहेब, ही माणसं येतात म्हणून आम्ही जगतोय- साहेब, सध्या कोरोना का काय तो रोग आलाय.., सोलापूर बंद झालंय. रोज मागून खातो मात्र सध्या मागायची सोय राहिली नाही. पोट भागवायचं कसं असा प्रश्न आम्हाला रोज पडतो. मात्र साहेब, अन्नदान करणारी ही माणसं जेव्हा येतात तेव्हा आम्हाला देव आल्यासारखा वाटतो. ही माणसं आहेत म्हणून आम्ही जगतोय, अशी भावनिक प्रतिक्रिया सिद्धेश्वर मंदिर येथील एका निराधाराने दिली. - डीआरएम आॅफिस, रेल्वे स्टेशन, भैय्या चौक मार्गावरील फुटपाथ, डॉ. आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर, कुष्ठरोग (लेप्रसी) वसाहत या भागात अनेक निराधार दररोज जेवणाची वाट पाहत असतात. 

निराधारांचं पोट भरलं की समाधान वाटतं : तमशेट्टीसध्या संचारबंदीमुळे निराधारांचे हाल होत आहेत. सोलापूर बंद असल्यामुळे निराधारांना मागूनही खाता येत नाही. पैसे नसल्यामुळे त्यांना काही घेता येत नाही. मोठ्या आशेने ही मंडळी आमची वाट पाहत असतात. निराधारांचं पोट भरलं की आम्हाला समाधान मिळतं, असे मत जय हिंद फूड बँकेचे सतीश तमशेट्टी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस