नियम पाळू, सलून दुकान चालू ठेवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:26 IST2021-08-12T04:26:33+5:302021-08-12T04:26:33+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत सलून व पार्लर व्यवसाय १३ ऑगस्टपासून करमाळ्यासह अन्य ठिकाणी बंद ...

Follow the rules, keep the salon shop running | नियम पाळू, सलून दुकान चालू ठेवू

नियम पाळू, सलून दुकान चालू ठेवू

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत सलून व पार्लर व्यवसाय १३ ऑगस्टपासून करमाळ्यासह अन्य ठिकाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाभिक समाज बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे दुकानाचे भाडे कसे भरणार,लाईट बिल,बँक हप्ते कसे भरणार,आदी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा कठोर निर्णय राज्य शासनाने माघारी घेण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाच्या प्रति पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस स्टेशन, मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी नारायण पवार, हरिभाऊ कोकाटे,राजेंद दळवी, अच्युत दळवी,अनिल क्षीरसागर, राजेंद जगताप,जयंत दळवी, मनोज गोरे,सोमनाथ काशिद, प्रवीण काळे,संतोष दूधाळ, आदी उपस्थित होते

----

Web Title: Follow the rules, keep the salon shop running