मोहिनी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST2021-05-24T04:21:32+5:302021-05-24T04:21:32+5:30
हिंदू सण व उत्सवानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरात विविध फुलांची व फळांची आरास करण्यात येत आहे. मोहिनी एकादशीनिमित्त मंदिरात ...

मोहिनी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट
हिंदू सण व उत्सवानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरात विविध फुलांची व फळांची आरास करण्यात येत आहे. मोहिनी एकादशीनिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्याची इच्छा रांजणगाव (पुणे) येथील नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे व्यक्त केली. त्यानुसार त्यांना अधिकाऱ्यांनी सेवा करण्याची संधी दिली.
फुलांची आरास करण्यासाठी झेंडू, मोगरा, गुलाब, आष्टर या फुलांचा वापर केला आहे. ही आरास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात श्री विठ्ठल चौखांबीस करण्यात आली आहे. यामुळे विठ्ठलाच्या गाभाऱ्यास मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे. यासाठी अंदाजे ८० हजार रुपये खर्च करून ३०० किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे. कोरोनामुळे श्री विठ्ठलाचे दर्शन व आकर्षक रूप भाविकांना प्रत्यक्ष जाऊन पाहता येत नसले तरी मंदिर समितीच्या वेब साइटवर पाहता आले आहे.
फोटो : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहेे.