राष्ट्रवादी युवकतर्फे सवलतीत पिठाची गिरणी, पाण्याचे फिल्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:52+5:302021-07-14T04:25:52+5:30

मोडनिंब : राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा तालुक्याच्यावतीने ५० टक्के सवलतीत पिठाची गिरणी व पाण्याचे फिल्टर वाटप उपक्रम आज मोडनिंब ...

Flour mill, water filter at a discount by NCP youth | राष्ट्रवादी युवकतर्फे सवलतीत पिठाची गिरणी, पाण्याचे फिल्टर

राष्ट्रवादी युवकतर्फे सवलतीत पिठाची गिरणी, पाण्याचे फिल्टर

मोडनिंब : राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा तालुक्याच्यावतीने ५० टक्के सवलतीत पिठाची गिरणी व पाण्याचे फिल्टर वाटप उपक्रम आज मोडनिंब शहरामध्ये‌ राबविण्यात आला. हा उपक्रम आजपासून दहा दिवस राबविला जाणार आहे. हा उपक्रम मोडनिंब राष्ट्रवादी युवती काॅंग्रेस शहराध्यक्षा ऋतुजा सुर्वे व मोडनिंब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखील गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केला.

कार्यक्रमासाठी मोडनिंबच्या सरपंच मीना शिंदे, ओबीसी सेलचे अध्यक्ष कैलास तोडकरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी पाटील, रामभाऊ नवले, निखिल मोरे, विकास भेगडे, मयूर काळे, मेघराज पाटील, उत्तम महाडिक, धवल पाटील, अतुल कासवेद, चंद्रकांत गिड्डे, एन. जी. ओहोळ अमित कोळी , किरण खडके , अतुल गाडे , सोमनाथ माळी ,राहुल पाटील, सदाशिव पाटोळे , अशोक भांगे, बालाजी वाघमारे, प्रमोद गाडे, राष्ट्रवादी महिलाध्यक्षा वर्षा जाडकर उपस्थित होते. (वा. प्र.)

---

फोटो : १३ मोडनिंब

राष्ट्रवादी युवकतर्फे सवलतीत पिठाची गिरणी, पाण्याचे फिल्टर वाटप करताना ऋतुजा सुर्वे, निखिल गिड्डे

Web Title: Flour mill, water filter at a discount by NCP youth