शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

गावागावातील गावकऱ्यांना पिठाची चक्की, बचतगटासाठी उभारणार मॉल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 16:06 IST

ग्रामपंचायतीचा आराखडा : आरोग्य केंद्र चकाचक, सांडपाणी घरातच जिरविणार

सोलापूर : जिल्ह्यातील दोन हजार शाळा स्वच्छ आणि सुंदर केल्यानंतर, आता जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामपंचायतीने तयार केलेल्या आराखड्यात घरपट्टी वेळेवर भरणाऱ्या गावकऱ्यांसाठी मोफत पिठाची चक्की, बचत गटातील वस्तूंसाठी तालुकास्तरावर मॉल, गावातील सांडपाणी घरातच जिरवणे व आरोग्य केंद्र चकाचक करण्यावर भर दिला आहे. १ हजार १९ ग्रामपंचायतींपैकी ७४५ ग्रामपंचायतींनी विकास आराखडे जिल्हा परिषदेला ऑनलाइन सादर केले आहेत.

शासनाने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा परिषद व पंचायत समितीचे विकास आराखडे ३० जानेवारीपर्यंत ई-ग्राम स्वराज्य पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी परिपत्रकाद्वारे सर्व गटविकास अधिकाऱ्यांना कळविले आहे. यात पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या अनुदानाचा तपशील कळविण्यात आला आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीने विकास आराखडे पोर्टलवर अपलोड केल्यानंतर, जिल्हा परिषदेचा विकास आराखडा तयार होणार आहे. आता आरोग्य केंद्र स्वच्छ व सुंदर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आराखडे परिपूर्ण होण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

 

३० जानेवारीची डेडलाइन

  • सीईओ स्वामी यांनी ग्रामपंचायतींना आराखडे अपलोड करण्याची ७ जानेवारीची डेडलाइन दिली होती. त्यानंतरही काम कमी झाल्यावर, पुन्हा १२ जानेवारी रोजी परिपत्रक काढून इशारा दिला. त्यावर ७४५ ग्रामपंचायतींनी आराखडे अपलोड केले.
  • आराखडे तयार करण्यासाठी १ हजार ११ ग्रामपंचायतींनी संस्था नियुक्त केली. यातील १ हजार ४ जणांनी आराखडा तयार केला. ९०७ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेण्याचे निश्चित केले. ८६९ ग्रामपंचायतींनी सभा घेऊन आराखडे अपलोड केले, पण त्यातील १६९ आराखडे फेल झाले.

 

अडचणी काय/

  • ०सर्वच ग्रामपंचायतींनी आराखडे तयार केले आहेत. आराखड्यात पाणी आणि स्वच्छतेसाठी प्रत्येकी ३० टक्के व इतर सुविधांसाठी ४० टक्के निधी राखीव ठेवायचा असतो. यात आरोग्य, महिला, बालकल्याणला महत्त्व दिले आहे.
  • ०या आराखड्याला तालुकास्तरीय तांत्रिक समितीची मान्यता लागते. ही समिती ठरल्याप्रमाणे निधीचे प्रस्ताव तयार झालेत की नाही, याची तपासणी करते. चूक असेल, तर दुरुस्तीसाठी प्रस्ताव परत पाठविते, यामुळे विलंब होत आहे.

माढा पंचायत समितीने बचतगटाच्या उत्पादनासाठी मॉल उभारण्यासाठी दहा लाखांची तरतूद केली आहे. ‘माझी वसुंधरा’चे काम सुरू आहे. ग्रामपंचायतीचे आराखडे मंजूर झाले आहेत. पोर्टलवर आराखडे अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

संताजी पाटील, गटविकास अधिकारी, माढा.

मोहोळ पंचायत समितीने स्वच्छता व सांडपाण्यावर भर दिला आहे. ग्रामपंचायतीने पर्यावरणासाठी झाडे लावणे, आरोग्य केंद्र सुशोभीकरण असे प्रस्ताव तयार करून आराखडे मान्यतेसाठी पाठविले आहेत. शंभर टक्के काम लवकरच होईल.

- गणेश मोरे, गटविकास अधिकारी, मोहोळ.

 

शासनाच्या सूचनेनुसार सर्व ग्रामपंचायत व पंचायत समितींना वेळेत आराखडे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आराखड्यात अभिनव कार्यक्रम हाती घेण्याबाबत सूचित केले आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने वेगवेगळे चांगले प्रस्ताव तयार केले आहेत.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी.

 

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायतSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद