माढ्यात ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:17+5:302021-02-05T06:44:17+5:30
माढा : माढ्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड मैदानावर ध्वजारोहण झाले. यावेळी आमदार ...

माढ्यात ध्वजारोहण
माढा : माढ्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड मैदानावर ध्वजारोहण झाले. यावेळी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार धनाजी साठे, तहसीलदार राजेश चव्हाण, नगराध्यक्षा मीनल साठे, माजी झेडपी सदस्य झुंजार भांगे, दादासाहेब साठे, नगरसेवक शहाजी साठे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी राऊत, नगरसेवक राजू गोटे नगरसेविका सुप्रिया बंडगर, अनिता सातपुते, नायब तहसीलदार बी. वाय. पतंगे, प्रदीप लोकरे, अधिकारी चरण कोल्हे, डी. व्ही. चवरे, मच्छिंद्र मोरे, शिवाजी कदम उपस्थित होते. माढा पोलीस स्टेेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कादबाने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, हवालदार मारुती लोंढे, पांडुरंग देशमुख, शब्बीर शेख, मोहम्मद शेख, चंद्रकांत गोरे, आसिफ शेख, विशाल देशमुख, रविराज जाधव, बालाजी घोरपडे उपस्थित होते.
नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा मीनल साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. माढा महाविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, लेफ्टन नवनाथ लवटे, प्रा. अशोक लोंढे, प्रा. जयवंत पालकर, प्रा. सतीश घाडगे, प्रा. सुजाता पाटील, प्रा. सौदागर शिंदे उपस्थित होते. माढ्यातील झेडपी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक नागेश खेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. व्यवस्थापन समितीचे धैर्यशील भांगे शिक्षक किरण भांगे, किरण शेलार, रवींद्र चव्हाण, भरत डुचाळ, लक्ष्मण राऊत,मीनाक्षी खेडकर,श्रीमती चव्हाण, क्षीरसागर उपस्थित होते. झेडपी मुलाच्या शाळेत केंद्रप्रमुख सुरेश माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोस्ट कार्यालयात उदय बंडगर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. माढेश्वरी अर्बन बँक येथे पत्रकार प्रमोद गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मातोश्री गोदावरी हर हर आश्रम शाळा येथे महेश हारहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्रवीण घाडगे, किरण जाधव, कैलास पाटील उपस्थित होते.
---
फोटो : २७ माढा
माढ्यात उपविभागीय अधिकारी ज्याेती कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करताना