शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच झोन समित्या भाजपकडे, दोन शिवसेनेला, एक विरोधकांना देणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 10:46 IST

सोलापूर महानगरपालिकेतील फॉर्म्युला : पालकमंत्री देशमुख, महेश कोठे यांच्यात चर्चा

ठळक मुद्दे१६ किंवा १७ मे रोजी विषय समित्यांच्या सभापती निवडी होण्याची शक्यता सात समित्यांपैकी महिला व बालकल्याण, कामगार व समाजकल्याण आणि विधी समिती शिवसेनेला देण्यावर शिक्कामोर्तबशिवसेनेने तीन समित्यांसह उपमहापौर पदावरही दावा केला आहे, यादरम्यान विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडेच ठेवण्यात येणा

सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांपैकी चार समित्या भाजपकडे तर तीन समित्या शिवसेनेला देण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवाय झोन समित्यांचा विषय याच महिन्यात मार्गी लावून आठ झोन समित्यांपैकी पाच झोन समित्या भाजपकडे ठेवण्यात येणार आहेत. दोन शिवसेनेकडे तर एक समिती काँग्रेस किंवा एमआयएमला सोडण्याचा निर्णय पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी घेतला आहे. 

लोकसभा निवडणुकीवेळी महापालिकेच्या सत्ताकारणात भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. सत्तेतील वाट्याबाबत भाजपकडून पालकमंत्री देशमुख तर शिवसेनेकडून महेश कोठे निर्णय घेत आहेत. 

विषय समित्यांच्या सदस्य निवडी २० एप्रिल रोजी झाल्या आहेत. १६ किंवा १७ मे रोजी विषय समित्यांच्या सभापती निवडी होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर देशमुख आणि कोठे यांनी रविवारी चर्चा केली. यावेळी सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक शिवानंद पाटील, राजकुमार हंचाटे, प्रथमेश कोठे आदी उपस्थित होते. 

सात समित्यांपैकी महिला व बालकल्याण, कामगार व समाजकल्याण आणि विधी समिती शिवसेनेला देण्यावर शिक्कामोर्तब झाले. झोन समित्यांचा विषय महापौरांकडे प्रलंबित आहे. हा विषय लवकर मार्गी लावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. एकूण आठ झोन समित्यांपैकी पाच समित्यांचे सभापती भाजपचे असतील. समित्या गठीत झाल्यानंतर कोणती समिती कोणाकडे राहील याचा निर्णय घेण्यात येणार आहे; मात्र मे अखेर झोन समित्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी दोन्ही पक्षांनी प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. 

विरोधी पक्षनेतेपद सेनेकडेच राहणार - शिवसेनेने तीन समित्यांसह उपमहापौर पदावरही दावा केला आहे. यादरम्यान विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडेच ठेवण्यात येणार आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे म्हणाले, सेना-भाजपची युती ही लेखी नव्हे तर तोंडी युती आहे. निवडणूक लढविता युती झाली असती तर कायद्यानुसार विभागीय आयुक्तांकडे त्याची नोंद झाली असती. आता निवडणुकीनंतर ते करता येणार नाही. पण आम्ही विषय समित्या, झोन समित्यांसाठी युती करीत आहोत. ठराविक विषयांवर केलेली युती ही वेगळी गोष्ट आहे. विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडेच राहील. त्यावर विरोधकांना संधी देण्याचा विचार नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा