इंदापूरजवळ अपघात, सोलापूरचे पाच पोलीस कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 14:37 IST2017-08-23T14:37:37+5:302017-08-23T14:37:42+5:30
सोलापूर दि २३ : शासकीय कामानिमित्त मुंबईला गेलेल्या सोलापूरच्या पाच जणांचा इंदापूरजवळ अपघात झाला़ या अपघातात पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे़ या जखमीत तीन महिलांचा समावेश आहे़

इंदापूरजवळ अपघात, सोलापूरचे पाच पोलीस कर्मचारी जखमी
सोलापूर आॅनलाइन लोकमत
सोलापूर दि २३ : शासकीय कामानिमित्त मुंबईला गेलेल्या सोलापूरच्या पाच जणांचा इंदापूरजवळ अपघात झाला़ या अपघातात पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे़ या जखमीत तीन महिलांचा समावेश आहे़
दरम्यान, शासकीय कामानिमित्त सोलापूरहुन मुंबईला स्कॉपिओ गाडीतून गेले होते़ कामकाज आटोपून ते परत येताना इंदापूरजवळ गाडीसमोर कुत्रे आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटला़ यात गाडीत पलटी झाल्याने गाडीतील पाच जण जखमी झाले आहेत़ यात पोलीस उपनिरीक्षक सानप, चव्हाण, शिंदे, जिंकले आदींचा समावेश आहे अशी माहिती समोर आली आहे़ या जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़