मटका खेळणारे पाचजण पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:23 IST2021-03-27T04:23:34+5:302021-03-27T04:23:34+5:30
मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना सांगोला शहरात कल्याण मटका नावाचा जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. ...

मटका खेळणारे पाचजण पोलिसांच्या ताब्यात
मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना सांगोला शहरात कल्याण मटका नावाचा जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार २५ मार्च रोजी विशेष पथकाचे फौजदार दत्तात्रय तोंडले, फौजदार जावळे, पोलीस कॉन्सटेबल संतोष चव्हाण, पोलीस कॉन्सटेबल मनोहर भोसले, पोलीस कॉन्सटेबल अभिजित साळुंखे, पोलीस कॉन्सटेबल सुनील पवार यांनी सागोल्यातील परीट गल्लीतील स्वप्निल चव्हाण याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा १ हजारांचा मुद्देमाल, समाधान बाबर (रा. वाढेगाव नाका) व बाळासो वाघमोडे (रा. कमलापूर) यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा २६४० रुपयांचा मुद्देमाल, शरद गावडे (रा. धनगर गल्ली-सांगोला) यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा ६६४० रुपयांचा मुद्देमाल, महादेव कांबळे (रा. धनगर गल्ली-सांगोला) याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा ९३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोकॉ संतोष चव्हाण, पोकॉ सुनिल पवार, पोकॉ अभिजीत साळुखे, पोकॉ मनोहर भोसले यांनी वरील पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केला आहे.